खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याची दखल घेऊन ज्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी …
Read More »राज्यातील १५ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
बंगळुरू : राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु, शिमोगा, दावणगेरे, हसन, यादगिरी, बेळगाव, धारवाड, कलबुर्गी, हावेरी आणि रायचूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, चिक्कमंगळूरू, कोडगु आणि शिमोगा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर …
Read More »शालेय विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्रांचे वितरण
खानापूर : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी स्वच्छ आणि शिस्तीने राहण्याचे शिकावे असे उद्गार निट्टूर गावचे सुपुत्र शिक्षणप्रेमी श्री. सुरज गणेबैलकर यांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्र वितरणावेळी काढले. सरकारी शाळांच्या विकासासाठी सध्या शिक्षकांसोबत काही जागरूक पालक सुद्धा प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा निट्टूर येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रेमी शाळेचे …
Read More »डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू
संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. श्रेया कृष्णा दवदते नावाच्या ९ वर्षीय मुलीचा या डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, मात्र आरोग्य विभाग आणि बीआयएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच या मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण न सांगता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गेल्या काही …
Read More »सदलगा – दत्तवाड रस्ता बनला प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा!
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष! चिकोडी (अण्णासाहेब कदम) : चिकोडी तालुक्यातील कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांना जोडणारा सदलगा – दत्तवाड रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोक्याचा बनला आहे. या रस्त्यावर किसान ब्रिजपासून दतवाड ब्रिजपर्यंत अनेक ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूनी खचला असून रस्त्यावर फुटा दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षभरापासून रस्ता दुरुस्तीसाठी …
Read More »खानापूर-जांबोटी मार्गावर कारचा अपघात; मच्छे येथील दोन ठार
खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर शनया गार्डन नजीक असलेल्या (कुंभार होळ) नाल्यावरील ब्रिजच्या संरक्षक कठड्याला जोराची धडक बसून जांबोटीकडे जाणाऱ्या कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची घटना, आज पहाटे (मध्यरात्री रात्री) १ च्या दरम्यान घडली आहे. या अपघातात मच्छे येथील शंकर …
Read More »‘मुडा’ घोटाळा: मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पत्नी पार्वती यांच्यासह १० जणांविरूध्द गुन्हा दाखल
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकारण (मुडा) घोटाळ्यासंदर्भात बनावट कागदपत्रे सादर करून भूखंड मिळवल्याच्या आरोपाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती आणि एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुडा घोटाळ्यात दिवसेंदिवस नवनवीन नावे ऐकायला मिळत आहेत, आता म्हैसूर विजयनगर पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार करून मुडाची फसवणूक झाल्याची …
Read More »‘वाल्मिकी’ महामंडळ घोटाळा : माजी मंत्री बी. नागेंद्र, आमदार दड्डल यांच्या घरावर ईडीचे छापे
बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळातील कोट्यवधींच्या बेकायदेशीर प्रकरणासंबंधात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी महामंडळाचे अध्यक्ष बसनागौडा दड्डल आणि माजी मंत्री नागेंद्र यांच्या घरावर छापा टाकला आहे. रायचूरच्या आशापुर रोडवरील आरआर (राम रहीम) कॉलनीतील प्रभाग क्रमांक २ मधील दड्डल यांच्या घरावर तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला आणि सकाळी ७ वाजल्यापासून घरातील …
Read More »७व्या वेतन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करा
खानापूर : खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघटना ही नोंदणीकृत संस्था ही गेल्या ५ ते ६ वर्षापासुन ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी अविरत सेवा देत असुन या संस्थेत अनेक ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यानी वेतन आयोगाचा अहवाल लागु करताना राज्य कर्मचारी संघाला यापूर्वीच आश्वासन दिले आहे. मात्र …
Read More »अभ्यासातील सातत्य, शिस्त हीच यशाची गुरुकिल्ली
वृषाली कांबळे; विविध संघटनातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : दहावी, बारावी नंतरच आपले ध्येय ठरविण्याची योग्य वेळ असते. विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कौशल्य शिक्षक, पालक आणि पुस्तके यांच्या मदतीने ओळखून आपले ध्येय ठरविणे महत्त्वाचे आहे. अभ्यासातील सातत्य, शिस्त व परिश्रम करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते, असे मतआयएएस …
Read More »