संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील बरेच रस्ते पावसाच्या पाण्याने उखडलेले दिसताहेत. बऱ्याच रस्त्यांची चाळण झाल्याने दुचाकी चारचाकी तसेच ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होतांना दिसत आहे. खड्डेमय रस्त्यांत पावसाचे पाणी साचून रस्त्याला ओढ्याचे स्वरुप प्राप्त झालेले दिसत आहे. येथील प्रभाग क्रमांक ४ मधील अंबिका नगरला जाणारा रस्ता चांगलाच गैरसोयीचा बनलेला …
Read More »बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे : प्रा. व्ही. बी. पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : विश्वगुरु श्री बसवेश्वरांचे वचन साहित्य समाजाला दिशा देणारे असल्याचे मजलट्टी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर सभामंडप येथे गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित एकदिवसीय विशेष व्याख्यान कार्यक्रमात वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला दिव्य सानिध्य बैलूरचे परमपूज्य श्री बसव चेतन देवरु …
Read More »माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्या वाढदिवस वृध्दांना शाल वाटपाने साजरा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सिल्व्हर डेल वृध्दाश्रमातील वृध्दांना वूलन शॉल वाटपाने माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक शिक्षण संस्थेचे संचालक बसनगौडा पाटील यांचेमार्फत शॉल वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सिल्व्हर डेल वृध्दाश्रमाच्या प्रमुख क्विझंटी यांनी बसनगौडा पाटील …
Read More »तांत्रिक कारणामुळे अडलेल्या दोन लाख घरांचा प्रश्न मार्गी : मुख्यमंत्री बोम्मई
हुबळी : तांत्रिक कारणामुळे दोन लाख घरांना मंजुरी मिळण्यास विलंब झाला होता, तो आता दूर करण्यात आला आहे. कच्च्या घरांचे पक्क्या घरात रूपांतर करण्याचा विचार आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी शहरातील विमानतळावर शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पाण्याचा वापर प्रमाणानुसार करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. …
Read More »तवंदी एसडीएमसी अध्यक्षपदी संतोष पाटील
उपाध्यक्षपदी शामबाला पाटील : दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : कोणत्याही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी येत असतो व तो निधी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व गावकरी मंडळींमधून एका व्यक्तीने सर्व कमिटी मेंबरला विश्वासात घेऊन शाळेची सुधारणा करण्यासाठी शाळा सुधारणा कमिटीची व्यवस्था शासनाने केलेली आहे. अशा तवंदी शाळेच्या शाळा …
Read More »गुरुशिवाय जीवनात ध्येय गाठणे अशक्य
प्राचार्य डॉ. शाह : देवचंदमध्ये गुरुपौर्णिमा साजरी निपाणी (वार्ता) : भारतीय परंपरेत गुरु – शिष्य नात्याला अनन्य साधारण महत्व आहे. शिष्याला आपले जीवन सुखी – समृद्ध बनवायचे असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणे आवश्यक आहे. गुरू शिवाय जीवनात इच्छित ध्येय गाठणे अशक्य आहे, असे मत प्राचार्य पी. पी. शाह …
Read More »हिडकल डॅममध्ये युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून
हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात अज्ञात मारेकर्यांनी एका युवकाचा चाकूने वार करून निर्घृण खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात राहणार्या परशुराम हलकर्णी नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. गावातील अंजनेय मंदिराजवळ काही हल्लेखोरांनी चाकूने वार करून हत्या करून फरार …
Read More »ईदलहोंड मराठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रामचंद्र पाटील हे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर एसडीएमसी अध्यक्ष तानाजी पाखरे, उपाध्यक्षा …
Read More »गर्लगुंजीत मराठी मुलांच्या कोसळलेल्या शाळा इमारतीची जिल्हा न्यायाधीशांकडून पाहणी
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ८५ वर्षा पूर्वी बांधण्यात आलेल्या मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीच्या तीन वर्गखोल्या नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाल्या. ही बातमी कळताच बेळगाव जिल्हा न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी, बीईओ लक्षणराव यकुंडी, खानापूर तालुका न्यायाधीश सूर्यनारायण, खानापूर तालुका वकिल संघटना अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी, …
Read More »प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेमध्ये प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील यांच्या हस्ते झाले विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायले. विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta