Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस, कबनाळीत घराची भिंत कोसळून लाखाचे नुकसान

खानापूर : खानापूर तालुका हा अति पाऊसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच अति जंगलाने वेढलेला तालुका आहे. अशा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्यापासुन धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी गावात जुन्या व मातीच्या घराची भिंत कोसळून राजू महाजिक या गरीब शेतकऱ्यांचे लाखोचे …

Read More »

मानवी जीवनात गुरुचे असाधारण महत्व

हभप राजू सुतार यांची कीर्तन : कोगनोळीत गुरुपौर्णिमा साजरी कोगनोळी : मानवी जीवनामध्ये गुरुचे असाधारण महत्व आहे. जीवनात गुरुची भेट होणे महत्त्वाचे आहे. गुरु भेट झाल्याशिवाय जन्म सफल होत नाही, असे मनोगत हभप राजू सुतार महाराज सांगाव यांनी व्यक्त केले. कोगनोळी तालुका निपाणी येथे मुरलीधर मंडपात आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमात ते …

Read More »

परंपरा, संस्कृती जपण्याचा प्रयत्न करा

डॉ. संदीप पाटील: ‘गोमटेश’ मध्ये गुरुपौर्णिमा साजरी निपाणी (वार्ता) : अनाधी काळापासून गुरूंना समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुमुळेच विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात करता येते. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भारतीय संस्कृती लोप पावत असून पाश्चातीकरणाचे अंधानुकरण चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली संस्कृती व परंपरा जपण्याचा प्रयत्न …

Read More »

सद्गुरु तायक्वांदो अकादमीची राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी

निपाणी (वार्ता) : बंगळुरुर येथे विफा कप खुल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धा अशोका कन्वेंशन हॉल राजाजी नगर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी येथील सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमीने १७ सुवर्ण पदक १५ रौप्य पदक तर २ कास्या पदक पटकावले. या स्पर्धा फाईट व फुमसे विभागात आयोजित करण्यात आल्या …

Read More »

खानापूर तालुक्यात घराची भिंत कोसळून मुलाचा मृत्यू

  खानापुर : गेल्या आठवडाभरापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खानापुर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चुंचवाड गावातील अनंतू धर्मेंद्र पाशेट्टी (१५) या मुलाचा मृत्यू झाला आहे. घराशेजारील घरात तो गायी बांधत असे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गोठ्यात गायी चारण्यासाठी …

Read More »

कर्नाटकाला मिळणार नऊ वॉटर एरोड्रोम; काळी नदी, अलमट्टी, हिडकल जलाशय येथे जल एरोड्रॉम्सची योजना

  बंगळूर : राज्यभरात नऊ वॉटर एरोड्रोम विकसित केले जातील, असे सांगून पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा यांनी बुधवारी सांगितले की, कर्नाटकला अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देताना विमानचालन-नेतृत्वाच्या विकासावर “टेक ऑफ” करण्यास त्यांची मदत होईल. कर्नाटकसाठी सर्वंकष नागरी विमान वाहतूक धोरण तयार करण्याबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सोमण्णा बोलत होते. …

Read More »

सौंदलगा हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाखेमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री. प्रदीप हरिभाऊ जोशी सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक समाज विकास विद्यालय सागाव तालुका शिराळा यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा उपयोग व्यवहारात कसा करावा हे सांगत गुरु शिष्य …

Read More »

संकेश्वरात आगीच्या दुर्घटनेत स्टेशनरी-किराणा दुकानाचे लाखोंचे नुकसान

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता येथील अरविंद कुलकर्णी यांचे सेंट्रल स्टोअर्स आणि गजानन रत्नप्पा मेहतर यांच्या किराणा दुकानाला आज सकाळी ६ वाजता शाॅर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली यांची चौकशी संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी …

Read More »

बॉक्सिंग बेतली जीवावर, बंगळुरुत सामन्यादरम्यान जखमी बॉक्सरचा मृत्यू, आयोजकांवर गुन्हा दाखल

बेंगळुरू : एक धक्कादायक घटना कर्नाटकच्या बंगळुरु शहरातून समोर आली आहे. एका किकबॉक्सरला बॉक्सिंग सामन्यादरम्यान रिंगमध्ये गंभीर दुखापत झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय मृत किक बॉक्सर हा म्हैसूरचा रहिवाशी असून निखिल एस. असं त्याचं नाव आहे. दरम्यान निखिलच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर सामने आयोजित करणाऱ्या आयोजकांविरुद्ध पोलिसांनी निष्काळजीपणाचा …

Read More »

शिडल्याळींची आरोग्य सेवा गरीबांना लाभदायक ठरावी : रमेश कत्ती

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शिडल्याळींची आरोग्य सेवा गोरगरिबांना लाभदायक ठरावी, असे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते शिडल्याळी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. श्रींच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाची …

Read More »