Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

राज्यात मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचाली गतिमान?

बेंगळुर : कर्नाटकात मुदतपूर्व निवडणुकीचे वारे वाहू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकंदर तीन्ही मोठ्या राजकीय पक्षाच्या वाढत्या कार्यक्रमांचा आलेख पाहता विधानसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीला नऊ महिने बाकी असताना राज्यातील सत्ताधारी भाजप, काँग्रेस, धजद सारख्या मोठ्या पक्षांच्या राजकीय हालचाली पाहता मुदतपूर्व निवडणुका …

Read More »

हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारूती मंदिर पाण्याखाली

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूती मंदिर गेल्या आठवड्यापासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याचा साठा वाढल्याने मंदिर पाण्याखाली गेले आहे. मलप्रभा नदीच्या पात्रात असलेल्या स्वयंभू मारूती मंदिराच्या स्लॅब बुडला आहे. नदीच्या पात्रात मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत …

Read More »

खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस; हलात्री पुलावर पोलिसांचा बंदोबस्त

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात येणार्‍या खानापूर-हेमाडगा गोवा महामार्गावरील हलात्री नदीच्या पुलावर गुरूवारी सकाळपासून पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी खबरदारी म्हणून खानापूर-हेमाडगा गोवा रोडवरील हलात्री नदीच्या पुलावरील वाहतुक बॅरिकेट लावून थांबविली आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव, दुथडी भरून वाहत आहेत. गुरूवारी …

Read More »

निपाणीकरांना शिवरायांच्या पादुकांच्या दर्शनाचे भाग्य!

उद्या शिव पादुकांचे समाधी मठात आगमन : किल्ले शिवनेरीहून प्रस्थान निपाणी (वार्ता) : पंढरपुराच्या आषाढीवारी साठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका सोहळ्याचे किल्ले शिवनेरीहून प्रस्थान झाले आहे. या सोहळ्याचे हे 8 वर्ष आहे. निपाणी या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिव्य पादुकांचे श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश प्राणालिंग स्वामींच्या …

Read More »

शेतकर्‍यांच्या हक्कासाठी संघटनेच्या पाठीशी रहा

  राजू पोवार : गोकाकमध्ये रयत संघटना शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सरकारच्या मारक धोरणामुळे शेतकरी अडचणीतच सापडत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे दरवर्षी नुकसान होत आहे. पण सर्वेमध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याने अनेक शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. परिणामी शेतकर्‍यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी …

Read More »

समाजातील अन्याया विरोधात आवाज उठवा

उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर : इनरव्हील न्यू जेन ग्लोरी क्लब पदाधिकार्‍यांची निवड निपाणी (वार्ता) : समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत आहे. अन्यायाविरोधात कारवाई करताना पोलिसांना समाजातील सुज्ञ नागरिकांची मदत महत्त्वाची ठरते. समाजात होणार्‍या अन्यायाला आळा घालण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. अन्याया विरोधात होणार्‍या प्रत्येक बाबीला आपला सदैव …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्‍या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. मंगळवार तारीख 13 व बुधवार तारीख 14 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका …

Read More »

संकेश्वरात चर्चेतील “पाखऱ्या “…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात बेंदूर निमित्त सदृढ बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेत करजगा येथील शिवानंद हिरेकोडी यांचा पाखऱ्या बैल चांगलाच लक्षवेधी आणि चर्चेत दिसला. पाखऱ्याचा तो रुबाब स्पर्धा संयोजकांना आणि उपस्थित शेतकऱ्यांना देखील चांगलाच भावलेला दिसला. सेकीन होसूर येथील प्रतिष्ठित शेतकरी देवेगौडा पाटील यांनी राजा-पाखऱ्या बैलजोडीला सदढ …

Read More »

अतिवृष्टी मदत निधीसाठी ५०० कोटी मंजूर

  मुख्यमंत्री बोम्मई, पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३२ जणांचा मृत्यू बंगळूर : राज्यात अलीकडच्या काळात पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी उडपी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सार्वजनिक पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी राज्य सरकार ५०० कोटी रुपये जारी करेल, …

Read More »

योगगुरू बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांच्या सन्मानाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक पी. डी. पाटील यांनी भूषविले होते. प्रारंभी शिक्षिका श्रीमती लिना कोळी, श्रीमती कुंभार यांनी प्रार्थना गीत सादर केले. योगसाधक म्हणाले, योगगुरू बसवराज नांगराळे यांच्यामुळे आपणा सर्वांना उत्तम आरोग्याची …

Read More »