Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

आमटे येथे छ. शिवाजी महाराज स्मारकाचे काॅलम भरणी संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : आमटे (ता. खानापूर) येथे नविन बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचा काॅलम भरणी कार्यक्रम रविवारी दि. २४ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जांबोटी विभाग माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक महादेव गावकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील, भाजपचे नेते माजी आमदार …

Read More »

कमतनूर वेसची डागडुजी कधी?

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील कमतनूर वेसची डागडुजी कधी करणार असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. संकेश्वरातील आदिलशाही इतिहासाची आठवण करुन देणाऱ्या कमानी लूप्त पावल्या आहेत. संकेश्वरातील दोन वेसींचे महत्व कायम स्वरुपी टिकवून ठेवण्याचे कार्य केले जात आहे. संकेश्वरातील प्रमुख कमतनूर वेसीचा ढाचा निखळून पडण्याच्या स्थितीत दिसतो आहे. कमतनूर वेसीवर संकेश्वरचे …

Read More »

बेळगांव खुल्या स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी रोलर स्केटिंगपटूंचे यश

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव रोलर स्केटिंग अकॅडमी व एस.के. इंटरनॅशनल स्पोर्ट्स अँड कल्चर अकॅडमी यांच्यावतीने नुकतेच बेळगाव येथे पार पडलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटरनी इनलाईन व क्वाड स्केटिंग 500 मी. स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेत आराध्या भमानगोल, श्रेयांश पांडे, जिया काझी, आरोही …

Read More »

खानापूर सरकारी दवाखान्यात महाआरोग्य शिबिरात १४ स्टॅालचे आयोजन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात सोमवारी दि. २५ रोजी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबीरात १४ स्टाॅलचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी महाआरोग्य शिबिराचे उदघाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर तहसीदार प्रविण जैन, डॉ. एम. व्ही. …

Read More »

हत्तरवाटमधील महिलेने जन्मले तिळे!

निपाणीतील पाटील नर्सिंग होममध्ये प्रसूती : डॉ. साईनाथ पाटील यांची माहिती निपाणी (वार्ता) : आतापर्यंत बहुतांश महिलांनी तिळ्यांना जन्म दिला आहे. पण त्यापैकी काही मोजकीच अर्भके जगत असल्याच्या घटना सर्वांनी पाहिल्या आहेत. पण निपाणी येथील कित्तूर चन्नम्मा चौकात शेजारील पाटील नर्सिंग होममध्ये एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला असून बालके व …

Read More »

बेनाडीच्या अमोल हजारेची मर्चंट नेव्हीमध्ये भरारी!

प्रतिकूल परिस्थितीत मिळवले यश : बेनाडी हायस्कूलचा पहिलाच विद्यार्थी निपाणी : जीवनात जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. हे बेनाडीच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अमोल अण्णासाहेब हजारे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबात ध्येय उराशी बाळगून  प्रयत्न केल्याने …

Read More »

संकेश्वरात दिवंगत महनिय व्यक्तींना 163 रक्तदात्यांची रक्तदानाने श्रध्दांजली…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ दिवंगत डॉ. सचिन मुरगुडे, डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया मुरगुडे, नगरसेवक संजय नष्टी, श्रीमती सुशिला शिवलिंग दड्डीमनी यांचे स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात 163 रक्तदात्यांनी रक्तदान केले. येथील संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन संकेश्वर मेडिकल असोसिएशन, …

Read More »

भाजप सरकारचे घोटाळे हळूहळू जनतेसमोर : डीकेशी

बेंगळुरू : पीएसआय नियुक्तीमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून केपीसीसी राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला असून ४० टक्के कमिशन प्रमाणे आता हि बाबदेखील जगजाहीर झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय. चिक्कमंगळूर येथील हरिहरमध्ये केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पीएसआय नियुक्ती घोटाळा काँग्रेसनेच उजेडात आणला आहे. पीएसआय नियुक्ती …

Read More »

बेकवाडच्या युवकाचा कुडाळ येथे अपघाती मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील रमेश नामदेव गुरव (वय ४२) यांचे कुडाळ (महाराष्ट्र) येथे घराचे बांधकाम करते वेळी पायडवरून पडून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपूर्वी बेकवाड येथून गवंडी कामासाठी तो कुडाळ (महाराष्ट्र) येथे गेला होता. कामावर असताना काम करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायडवरून काल सायंकाळी खाली कोसळल्याने त्याला वर्मी …

Read More »

कुसमळीत नारळाच्या झाडावर वीज पडून नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे शनिवारी दि. २३ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या वादळी वाऱ्यासह वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. याचवेळी कुसमळी गावचे शेतकरी यल्लापा कल्लहोळकर यांच्या परसुतील नारळाच्या झाडावर कडाडाच्या आवाजसह वीज पडली. लागलीच नारळाच्या गाभ्याने पेड घेतला व बघता बघता नारळाचे झाड पेटू लागले. हे आश्चर्य …

Read More »