मुख्यमंत्री बोम्माई : दसर्यानंतरच प्राथमिक शाळांबाबत निर्णय बंगळूरू : महाराष्ट्र आणि केरळ राज्यासह सीमावर्ती जिल्ह्यात लादण्यात आलेले कोविड निर्बंध दसरा सणानंतर शिथिल करण्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी सांगितले. प्राथमिक शाळा सुर करण्याबाबतही त्याचवेळी निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री …
Read More »एक रकमी एफआरपी दिल्याशिवाय ऊस तोडू नये
शेतकर्यांच्या बैठकीत जिल्हाधिकार्यांचा आदेश निपाणी : बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना, जिल्हाधिकारी आणि बेळगाव सर्व साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रयत संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी मागील वर्षीची थकबाकी दिल्याशिवाय व यावर्षीची एकरकमी एफआरपी जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करु नये असे आदेश दिले …
Read More »नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरत आहे : उच्च शिक्षण मंत्री अश्वथनारायण
बेळगाव : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत असून नवे शिक्षण धोरण सर्वांसाठी फायद्याचे असल्याचे मत कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी व्यक्त केले. बेळगावमधील केएलईएस संस्थेच्या कॅम्पसमधील जिरगे हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत असल्यासंदर्भात …
Read More »पाटील कुटुंबियांनी जोपासली माणुसकी!
युवानेते उत्तम पाटील : बोरगाव येथे 85 पूरग्रस्तांना 5 लाखांवर धनादेश वितरण निपाणी : कोरोना, महापूर यासह नैसर्गिक संकटामध्ये समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. आपल्यातील माणुसकीचा उपयोग हा समाज कार्यासाठी झाला पाहिजे, या हेतूने शहरातील पोलीस पाटील असलेल्या शशिकला पाटील यांनी निपाणी मतदार संघातील पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयाची मदत देऊन …
Read More »कोगनोळीत जागर सोहळा उत्साहात
हजारो भविकांची गर्दी : अंबाबाई, बिरदेव पालखी मिरवणूक कोगनोळी : येथील हजारो भविकांचे श्रध्दास्थान आसलेल्या श्री अंबिका देवीचा जागर व नवरात्रोत्सव सोहळा उत्साहात साधेपणाने संपन्न झाला. बुधवार (तारीख 13) जागर सोहळयानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी आठ वाजता देवीची आरती करून सजविलेल्या पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव गल्ली, …
Read More »कचरा डेपो प्रकल्पाला मिराशी वाटरे ग्रामस्थांचा विरोध
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मोहिशेत ग्राम पंचायत हद्दीतील मिराशी वाटरे गावाच्या हद्दीत सरकारच्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. यासंदर्भात मिराशी वाटरे गावाच्या ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हल्लणावर यांना निवेदन देऊन प्रकल्पाला विरोध केला. यावेळी निवेदनात म्हटले आहे की, …
Read More »पुजार्यांना सहावा वेतन आयोग आणि आरोग्य विमा मिळणार : मंत्री शशिकला जोल्ले
हुक्केरी : धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्या मंदिराच्या पुजार्यांना तसेच कर्मचार्यांना आरोग्य विमा सुरक्षा आणि सहावा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात धर्मादाय तसेच हज आणि वक्फ विभाग मंत्री शशिकला जोल्ले यांनी नुकतीच घोषणा केली होती. या घोषणेसंदर्भात अधिकृत माहिती आज हुक्केरी हिरेमठाच्या दसरोत्सवात त्यांनी दिली आहे. हुक्केरी हिरेमठाच्या दसरा उत्सवांतर्गत रंगायन नाटकोत्सवाचे …
Read More »शोषितांच्या जगण्याला बळ देऊया
प्रा. सुरेश कांबळे : डॉ. आंबेडकर विचार मंचची चिंतन बैठक निपाणी : अलीकडच्या काळात समाजामध्ये राजकीय नीतिमूल्ये यांच्यामध्ये अतिशय नकारात्मक भावना निर्माण होऊन समाजाला दिशाहीन बनवणार्या व्यवस्थेत खर्या अर्थाने शोषितांची अवस्था वाईट होत आहे. हा समाज जगण्यासाठी धडपडत आहे. परंतु प्रस्थापित समाज वस्तीमध्ये अशा गरीब समाजाला दुर्लक्षित ठेवून राजकीय लाभ …
Read More »महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्या
कागल तालुका शिवसेनेची मागणी : मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी यांना निवेदन निपाणी (वार्ता): महाराष्ट्रातील एस.टी.ना कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशा मागणीचे निवेदन कागल तालुका शिवसेनेच्या वतीने निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक निपाणी सीमाभागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली, लिंगनूर, मुरगुड, …
Read More »निपाणीत पावसाचा हाहाकार!
घराघरात पाणी : घरांच्या भिंतीनाही पाणी निपाणी : आठवडाभर उन्हाचा तडाखा बसून सोमवारी (ता. 11) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शहर आणि परिसरात हाहाकार माजला. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील शिवाजीनगर सहाव्या गल्लीतील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. हे पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ …
Read More »