निपाणीत हॉटेलवर कारवाई : पाच महिलांची सुटका निपाणी : येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर शनिवारी(ता.२६) रात्री उशिरा शहर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून आठ जणांवर कारवाई केली. यामध्ये एका परदेशी महिलेचा समावेश आहे. मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय …
Read More »रविवारी खानापूरात पोलिओ डोसचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी): तब्बल दोन वर्षानंतर आरोग्य खात्याच्यावतीने खानापूर सरकारी दवाखान्यात ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचा शुभारंभ रविवार दि. २७ रोजी देण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजीव नांद्रे, डॉ. तसमीन भानू, डॉ. प्रगती विनायक, डॉ. प्रेमा तोंडी, त्याचबरोबर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने, प्रेमानंद नाईक, एस. आर. पाटील, …
Read More »निडसोसी महाशिवरात्र महोत्सवात मंत्री उमेश कत्तींंचा सहभाग
संकेश्वर (प्रतिनिधी) : राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी आज निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाला धावती भेट देऊन देवदर्शनाबरोबर श्रींचा आशीर्वाद घेतला. निडसोसी मठात महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मंत्रीमहोदयांनी आपला सहभाग दर्शविला. यावेळी निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी मंत्री उमेश कत्तीं यांना महाशिवरात्र …
Read More »ज्ञानोबा, तुकोबांच्या मराठी भाषा समृद्धीवर मोहोर उमटवा!
प्रा. राजन चिकोडे यांचे पत्रक : मराठी भाषिकांची एकजुटीने लढावे निपाणी (वार्ता) : सुमारे अडीच हजार वर्ष प्राचीन व समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सीमा भागातील व इतर राज्यातील मराठी भाषिक संस्था व व्यक्तीनीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ज्ञानोबा, तुकोबांच्या मराठीची पताका दिल्ली तख्तावर फडकविणेसाठी राजकीय मतभेद …
Read More »ऑनलाईन फसवणुकीचा फंडा निपाणीपर्यंत!
युवकाला 80 हजाराचा गंडा: नागरिकांच्या सतर्कतेची गरज निपाणी (वार्ता) : सर्वत्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाच्या वतीने फसवणुकीपासून नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन येत आहे. तरीही अनेकजण ठकसेनेच्या जाळ्यात अडकले जात असून त्यांना आर्थिक व मानसिक नुकसान सहन करावे लागत आहे. येथील एका उद्योजक युवकाची अशीच बनावट कर्ज देणार्या …
Read More »संंकेश्वर-गडहिंग्लज आगाराच्या बस धाऊ लागल्या…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लजला ये-जा करणार्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हुक्केरी तालुका श्रीरामसेना हिन्दुस्तान आणि कोल्हापूर भाजपा पदाधिकार्यांनी संकेश्वर-गडहिंग्लज आगार व्यवस्थापकांना संकेश्वर-गडहिंगलज बस फेर्या सुरू करण्याचे निवेदन सादर केले. निवेदनाची सत्वर दखल घेऊन दोन्ही आगाराच्या व्यवस्थापकांनी 13 फेब्रुवारी 2022 बस फेर्या सुरू केल्या. गडहिंग्लज आगाराने संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर लालपरीच्या फेर्या …
Read More »महालक्ष्मीच्या नावाने चांगभलच्या गजरात कणगला महालक्ष्मी यात्रोत्सव..
संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भक्तीमय वातावरणात प्रारंभ करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 25 रोजी रात्री कुंभार गल्लीतील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात देवीचा साजश्रृंगार करुन पूजाअर्चा आणि देवीची ओटी भरुन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. महालक्ष्मीच्या नावाने चांगभलच्या जयघोषात. महालक्ष्मी देवीची मूर्ती खेळविण्याचा कार्यक्रम रात्रभर परंपरागत पद्धतीने संपन्न …
Read More »खानापूर तालुका विकास आघाडीकडून गस्टोळी कॅनलची पहाणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गस्टोळी येथील गेल्या सात आठ वर्षांपूर्वी शेतकरी वर्गाच्या पिकाला पाण्याची व्यवस्था व्हावी. यासाठी मंग्यानकोप ग्राम पंचायत हद्दीतील शिवाजी नगरातील गोमारी तलावाला जोडलेल्या गस्टोळी कॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र नुकताच गस्टोळी कॅनल हा कोसळला. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. …
Read More »निपाणीतील गंडेदोरे उताऱ्यांची स्वच्छता
दौलतराव पाटील फाउंडेशनची मागणी: नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगातही औषधोपचार सोबत तंत्र मंत्र उतारा यांचाही आधार घेतला जातो. याचा प्रत्येय निपाणी येथील कोल्हापूरवेस मार्गावरील दौलतराव पाटील उड्डाण पुला जवळ आला. या ठिकाणी अनेक पद्धतीच्या उताऱ्यासह गंडेदोरे पडत होते. या रस्त्यावर शाळकरी मुलापासून महिला आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. …
Read More »शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवा
रयत संघटना : जिल्हाधिकार्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच वर्षापासून पिक कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असून त्याचे तात्काळ निवारण करावे, या मागणीसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.२५) जिल्हाधिकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta