संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भक्तीमय वातावरणात प्रारंभ करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 25 रोजी रात्री कुंभार गल्लीतील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात देवीचा साजश्रृंगार करुन पूजाअर्चा आणि देवीची ओटी भरुन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. महालक्ष्मीच्या नावाने चांगभलच्या जयघोषात. महालक्ष्मी देवीची मूर्ती खेळविण्याचा कार्यक्रम रात्रभर परंपरागत पद्धतीने संपन्न झाला. देवीच्या मूर्तीवर भक्तगणांकडून पुष्पवृष्टी आणि भंडार्याची मोठ्या स्वरुपात उधळण करण्यात आली. मिरवणूक मार्गावर भक्तगण देवीचे दर्शन घेऊन पुनित होताना दिसले. श्री लक्ष्मी देवीला खेळवितांना दिवटीने इंगळोबावर परंपरागत पद्धतीने हल्ला चढविणेचे दृश्य पहावयास मिळाले. देवीला खेळवितांना फटाक्यांची तुफान आतषबाजी करण्यात आली. देवीला खेळविण्याचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा पंचकमिटीचे विशेष परिश्रम घेतले.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220226-WA0141-660x330.jpg)