Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

हिरेकोडी येथील मिरजी कोडी कोंबडी खाद्य कारखान्यापासून वायु प्रदूषण व पाणी प्रदूषण….

  ननदी (प्रतिनिधी) : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी हद्दीमधील मिरजी कोडी वस्तीमध्ये आयटी इंडस्ट्री या कोंबडी खाद्य व कोंबडीची पिल्ले तयार करणाऱ्या फॅक्टरीच्या सांडपाण्यामुळे तसेच दुर्गंधीमुळे परिसरातील पिण्याचे पाणी प्रदूषण व हवेच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रदूषणामुळे लहान मुले व वृद्धांना घशाचा आजार व भूक न लागणे यासारखे भयंकर त्रास …

Read More »

बांगलादेशात कट्टरपंथी इस्लामवाद्यांकडून हिंदूंचा छळ हा चिंतेचा विषय

  संघाच्याअखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत महत्वपूर्ण ठराव बंगळूर : बांगलादेशातील सत्तापालटानंतर कट्टरपंथी इस्लामी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर होत असलेल्या कथित नियोजित हिंसाचार, अन्याय आणि दडपशाहीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शनिवारी गंभीर चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या (एबीपीएस) …

Read More »

…चक्क म. ए. समितीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून कन्नड संघटनांनी शमवून घेतला शंड…

  बेंगळुरू : मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीचा निषेध करण्यासाठी विविध कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंददरम्यान चक्क म. ए. समितीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आपला शंड शमवून घेतला. बंगळुरूमध्ये कन्नड समर्थक संघटनांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. म. ए. समितीची प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे आयोजन करून आपला संताप व्यक्त केला. कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी …

Read More »

पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोन मुली जखमी

  खानापूर : तालुक्यातील बीडी गावात घरासमोर खेळत असलेल्या दोन मुलींवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. गावातील आराध्या काळे नावाच्या 10 वर्षीय मुलीवर प्रथम हल्ला केलेल्या कुत्र्याने तिला खाली पाडले आणि तिच्या कानाला चावा घेतला. त्यानंतर आणखी एक मुलगी निदा समशेर (10) हिच्यावरही हल्ला करून जखमी करून …

Read More »

भाजपचे 18 आमदार निलंबित..

    बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी विधानसभेतील भाजपच्या 18 आमदारांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. सभापतींच्या खंडपीठाचा अनादर केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 18 आमदारांना तत्काळ 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना तातडीने विधानसभा सोडण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत. लोकशाही व्यवस्थेत सभापतींच्या खंडपीठाचा आदर केला …

Read More »

ग्राहकाना वीज दरवाढीचा शॉक; प्रति युनिट ३६ पैसे दरवाढ

  पुढील दोन वर्षात अनुक्रमे ३५ व ३४ पैसे दरवाढीस मंजूरी बंगळूर : बस भाडे आणि मेट्रो भाडे यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यानंतर कर्नाटक वीज आयोगाने (केईआरसी) ग्राहकांना विजेचा शॉक दिला आहे. वीजदरात प्रति युनिट ३६ पैसे वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुधारित दर एक एप्रिलपासून लागू …

Read More »

कर्नाटक बंद पुकारण्याची गरज नव्हती : डी. के. शिवकुमार

  बेंगळुरू : कर्नाटक राज्यातील विविध कन्नड संघटनांनी 22 मार्च रोजी कर्नाटक बंदची हाक देण्याची गरज नव्हती. त्यांच्या मागण्यांबाबत ते सरकारशी चर्चा करू शकले असते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधान परिषदेत सांगितले की, बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर काय पावले उचलली जातील याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी सुनील पाटील; रणजीत पाटील गटाचा एकतर्फी विजय

  खानापूर : हलगा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. अध्यक्षपदाची निवड जाहीर होताच फटाक्याची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तत्कालीन ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास …

Read More »

कुमारस्वामींच्या फार्महाऊसचे अतिक्रमण हटवण्याची तयारी

  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई बंगळूर : केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर यापूर्वी रामनगरातील बिडदी येथील जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. अतिक्रमण हटवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभाग आता अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करत आहे. महसूल विभाग अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करत आहे. राज्य सरकारने एखाद्या …

Read More »

मुस्लिमांना सरकारी कंत्राटामध्ये आरक्षणाचे विधेयक विधानसभेत सादर

  बंगळूर : सरकारी कंत्राटी कामांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण आणि मागासवर्गीयांना वस्तू आणि सेवांमध्ये आरक्षण देणारे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार, सार्वजनिक वस्तू आणि सरकारी कंत्राटांमध्ये मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी आज विधानसभेत विधेयक …

Read More »