Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटक

डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्थानकातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

  खानापूर : नंदगड येथील डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्टेशन नंदगडचे सी.पी.आय श्री. एस. सी. पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण शिक्षण घेत असताना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही वाईट मार्गाच्या आहारी जाऊ नये जेणे करून आपले शैक्षणिक जीवन उद्भवस्त होऊ शकते. तसेच समाजामध्ये वावरत …

Read More »

शिरोळच्या गोविंदा पथकाने फोडली निपाणीची दहीहंडी; दीड लाखाचे मिळवले बक्षीस

  निपाणी (वार्ता) : ‘गोविंदा रे गोपाला’चा गजर, तरुणाईचा नृत्याचा ठेका, अधून, मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, गगनाला भिडलेला आवाज अशा वातावरणात निपाणीत दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

Read More »

काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी माजी आमदार अंजली निंबाळकर यांची नियुक्ती

    खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. या नियुक्तीबद्दल माजी …

Read More »

नोकरीसाठी बनावट गुणपत्रिका सादर केलेल्या ३७ उमेदवारांना अटक; बेळगावच्या तिघांचा समावेश

  जलसंपदा विभागात नोकरी, एकूण ४८ जण ताब्यात बंगळूरू : जलसंपदा विभागाच्या ‘क’ गट द्वितीय सहाय्यक पदासाठी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या ३७ अपात्र उमेदवार, तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह ११ मध्यस्थ अशा एकूण ४८ जणाना अटक करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले आहे. बनावट गुणपत्रिका सादर केलेल्यांमध्ये बेळगावच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. हसनचा …

Read More »

नियमांच्या चौकटीत गणेशोत्सव साजरा करावा

  तहसीलदार प्रवीण कारंडे; निपाणी शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्व प्रकारच्या परवानगी घेऊनच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. गणेशाचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करावे. कायद्याच्या चौकटीत हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. …

Read More »

शिवकुमारांच्या चौकशीची सीबीआयची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

  बंगळूरू : बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध चौकशीला परवानगी देण्याची सीबीआयची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. उच्च न्यायालयाने सीबीआय आणि भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांच्या याचिका फेटाळल्या आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते शिवकुमार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत सीबीआय चौकशीसाठी कर्नाटक सरकारची संमती रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान …

Read More »

मुडा प्रकरण : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अर्जाची सुनावणी शनिवारपर्यंत स्थगित

  बंगळूरू : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) च्या जागा वाटप घोटाळ्यात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट (शनिवार) पर्यंत पुढे ढकलली आहे. या खटल्यातील लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची सुनावणी घेणाऱ्या लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाला पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत कामकाज पुढे ढकलण्याचे निर्देश …

Read More »

निपाणी नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता

  नाट्यमय घडामोडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगरपालिकेवर बालेकिल्ला अबाधित राखण्यात भाजपाला यश आले आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका सोनल राजेश कोठडीया यांची तर उपनगराध्यक्षपदी संतोष हिंदुराव सांगावकर यांची निवड झाली. यामध्ये कोठडीया व सांगावकर यांना १७ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

Read More »

आंतरराज्य दुचाकी चोरट्याला निपाणी पोलिसांकडून अटक

  बेळगाव (वार्ता) : निपाणी पोलिसांनी एका अट्टल आंतरराज्य चोरट्याला अटक करून 10 मोटरसायकली जप्त केल्या असून गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावातील विशाल संजय मोरे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. निपाणी हालसिद्धनाथ मंदिराजवळ निपाणी बसवेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय रमेश पवार हे ड्युटीवर असताना हा मोटरसायकल चोर पोलिसांच्या हाती लागला. पडलीहाळ …

Read More »

अभिनेता दर्शनला बेळ्ळारी कारागृहात हलवले!

  बेळ्ळारी : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी यांच्या हत्येच्या आरोपाखाली बेंगळुरूच्या परप्पन येथील अग्रहार कारागृहात कैद असलेल्या अभिनेता दर्शन आता बेळ्ळारी कारागृहात आज गुरुवारी सकाळी चोख पोलीस बंदोबस्तात हलवण्यात आले. अभिनेता दर्शनला तुमकूर येथून क्यातसांद्र टोलमार्गे बेळ्ळारी येथे नेण्यात आले. दरम्यान, आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेता …

Read More »