Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

पोलिस स्थानकातच महिलेसोबत “रासलीला” करणारा डीवायएसपी निलंबित

  मधुगिरी : जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत पोलिस स्थानकात “रासलीला” केल्याप्रकरणी तुमकूर जिल्ह्यातील मधुगिरी उपविभागाचे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांना निलंबित करण्यात आले आहे. जमिनीच्या वादात तक्रार देण्यासाठी आलेल्या पावगड येथील महिलेशी डीवायएसपी रामचंद्रप्पा यांनी बळजबरीने “रासलीला” केली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. डीवायएसपीचा व्हिडिओ व्हायरल होताच डिजी …

Read More »

इचलकरंजी – सदलगा मार्गावर पंचगंगा नदी पुलाजवळ वाहतुकीची मोठी कोंडी

  चिक्कोडी : इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमी जवळील दुहेरी वाहतुकीच्या रस्त्याचे बांधकाम लवकर पूर्ण करावे व अपघातांची मालिका टाळावी अशी प्रवाशांची मागणी. इचलकरंजी- सदलगा या मार्गावर पंचगंगा पुलाच्या शेजारी असणाऱ्या नूतन पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येत असून त्याच्या पुढील रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे पंचगंगा पुलाजवळ एकेरी वाहतूक सुरू असून …

Read More »

दिलेले पैसे परत मागणाऱ्या गर्भवती सुनेची सासऱ्याने केली हत्या!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात गेल्या १० दिवसांपूर्वी सुवर्णा मातय्या नावाच्या गर्भवती महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून प्रकरणाची अधिक चौकशी केली असता नवा ट्विस्ट समोर आला आहे. आपल्याच सासऱ्याने सुनेची हत्या केल्याचे समजते. आपय्या …

Read More »

….चक्क पोलिस स्थानकातच डीवायएसपीची महिलेसोबत “रासलीला”; व्हिडिओ व्हायरल

  मधुगिरी : जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेसोबत डीवायएसपीने चक्क पोलिस स्थानकातच “रासलीला” केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पावगड येथील जमिनीच्या वादाची तक्रार घेऊन आलेल्या महिलेला मधूगिरीचे डीवायएसपी रामचंद्रप्पा यांनी कार्यालयाच्या शौचालयात नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करून “रासलीला” केली. काहींनी मोबाईलवर याचे चित्रीकरण केले आहे. डीवायएसपी रामचंद्रप्पा यांच्या विरोधात …

Read More »

भाजप नेते प्रमोद कोचेरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  खानापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक 2 जानेवारी रोजी खानापूर येथील बांधकाम विभागाच्या विश्रामधामात खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, संजय कुबल, बसवराज सानिकोप, बाबुराव देसाई, गुंडू तोपिनकट्टी, चेतन मणेरीकर व शेकडो कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सुरुवातीला …

Read More »

धुमधडाक्यात मराठा मंडळाच्या स्पोर्ट्स मेनिया २०२५ प्रारंभ होणार!

  खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा आज वर्धापन दिन तसेच स्त्री शिक्षणाची नांदी करणाऱ्या सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून बहुजन समाजाच्या शिक्षणाची परवड थांबविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या शिक्षण संस्थेने खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक अभिनव क्रीडा उपक्रम हाती घेतला आहे. मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या …

Read More »

धारवाडला स्वतंत्र महापालिकेचा दर्जा

  हुबळी-धरवाड महापालिकचे विभाजन बंगळूर : हुबळी-धारवाड महानगर पालिकेचे विभाजन करून स्वतंत्र धारवाड महानगर पालिकेच्या निर्मितीला गुरूवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे आता हुबळी आणि धारवाड या दोन स्वतंत्र महापालिका अस्तित्वात येणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हुबळीपासून धारवाडला तात्काळ वेगळे करून महानगर पालिका स्थापन …

Read More »

राज्यात बसच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ

  नवीन वर्षाचा प्रवाशांना धक्का; दरवाढ पाच जानेवारीपासून लागू बंगळूर : राज्य सरकारने बस प्रवाशांना नवीन वर्षासाठी झटका दिला आहे, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आणि बंगळुर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) सह चार महामंडळांच्या बस तिकीट दरात १५ टक्याने वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली. ही …

Read More »

शिंदोळी खुर्द येथे विठ्ठल रुखुमाई मंदिराचा उदघाटन सोहळा व कळसारोहण मोठ्या उत्साहात संपन्न

  खानापूर : मौजे शिंदोळी खुर्द तालुका खानापूर येथे बुधवार दिनांक 25 आणि 26 रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मंदिर जुने होते त्याचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प गावातील सर्व युवावर्ग आणि ग्रामस्थांनी घेतला. जवळजवळ दोन ते अडीच वर्ष मंदिरचे काम चालू होते. …

Read More »

अमृत महोत्सव सत्कारमुर्ती व सहस्त्रचंद्र दर्शन सत्कारमूर्तींचा सत्कार!

  खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक संघाचा १४ वा अमृत महोत्सव सोहळा सोमवारी दि./३० डिसेंबर रोजी शिवस्मारकात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी अध्यक्ष विलास बेळगांवकर, पीएलडी बँक अध्यक्ष …

Read More »