Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा पट्टा पडला!

  गाळप आणि साखर उत्पादनात जवाहर कारखाना आघाडीवर कोगनोळी : नजिकच्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सात साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. जिल्ह्यातील अथर्व इंटर ट्रेड, हमिदवाडा सदाशिवराव मंडलिक, गडहिंग्लज, बांबवडे, तांबाळे, संताजी घोरपडे, इको केन चंदगड या सात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली …

Read More »

रयत संघटना राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी घेतली मनोज जरांगे -पाटील यांची भेट

  मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा निपाणी (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत होणाऱ्या अन्यायासह मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि देशातील शेतकऱ्यांच्यावर होत असलला दूर करण्यासाठी …

Read More »

हिंडलगा कारागृहावर पोलिसांचा अचानक छापा

  बेळगाव : बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून तपासणी केली आहे. डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून डीसीपीला बेळगावच्या 5 विभागाचे एसीपी, सीपीआय यांचे सहकार्य लाभले आहे. हिंडलगा कारागृहात अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर हा छापा घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारागृहातील अवैध धंदे रोखण्यासाठी …

Read More »

जनावरांना चारा वाटपास प्रारंभ

  रयत संघटनेच्या मागणीची दखल; प्रत्येक शेतकऱ्याला २० किलो चारा निपाणी (वार्ता) : निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यात उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत रयत संघटने तर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनातर्फे बेळकुड येथून शेतकऱ्यांना चारा देण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला २० …

Read More »

केंद्रात काँग्रेस सत्तेची गरज : पालकमंत्री सतीश जारकीहोळी

  निपाणीत काँग्रेस मेळावा निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या जाहीर नाम्यातील पाचही योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आधार लागला आहे. केंद्रात सत्ता आल्यास आणखीन नवनवीन योजना राबवू, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.२९) मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात काँग्रेस पक्षा …

Read More »

रंगात, रंगली निपाणी

  अबालवृद्धांनी लुटला आनंद निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात शनिवारी (ता.३०) रंगपंचमीचा जल्लोष पाहायला मिळाला. सकाळी सात पहिल्यापासूनच बालचमू, युवक, तरुणी आणि महिलांनी विविध रंगांची मुक्त हस्ते उधळण केली. तर लहान मुलांनी आकर्षक पिचकान्यांमधून एकमेकांवर रंग उडवून रंगपंचमीच्या आनंद लुटला. शहरातील चौका चौकात संगीताच्या तालावर मनमुरादपणे नृत्य करत होते. …

Read More »

४० टक्के कमिशन जाहिरात; सिध्दरामय्या, शिवकुमारना समन्स जारी

  राहूल गांधीना एक जूनपर्यंत सवलत बंगळूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर विविध पदांसाठी दर निश्चित केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भ्रष्टाचाराच्या नावाखाली जाहिरात प्रसिद्ध करून या प्रकरणाची बदनामी केली होती. लोकप्रतिनिधींच्या विशेष (दंडाधिकारी) न्यायालयाचे न्यायाधीश जे. प्रीत यांनी काँग्रेसविरोधात भाजपने केलेल्या खासगी …

Read More »

कर्नाटकात २०.८५ कोटी रुपये, २७ कोटींची दारू जप्त

  बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून, कर्नाटकमध्ये २०.८५ कोटी रुपयांची रोकड आणि २७ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी सांगितले. कर्नाटकात २६ एप्रिल आणि ७ मे रोजी दोन टप्प्यात २८ मतदारसंघांसाठी लोकसभा निवडणुका होणार आहेत. आतापर्यंत जप्त केलेली एकूण …

Read More »

कणकुंबी चेकपोस्टवर 7,98000/- लाख रुपये जप्त

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्टवर समर्पक कागद्पत्रांविना वाहनातून नेण्यात येणारी 7,98000/- लाख रुपये रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केली. 14-खानापूर विधानसभा मतदार संघातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी तपासणी नाक्यावर गोव्याहून येणारी केए-29 एफ-1532 क्रमांकाची कार एसएसटी पथकाने अडवून तपासणी केली. बैलहोंगल तालुक्यातील गांधीनगर गल्ली, वन्नुर येथील संजय बसवराज रेड्डी ही …

Read More »

कर्नाटकात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

  अधिसूचना जारी बंगळूर : राज्यातील २६ एप्रिल रोजी होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात १४ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, या निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली …

Read More »