एकरी ३० किलो सोयाबीन ; मूग, उडीदही उपलब्ध निपाणी (वार्ता) : जून महिन्यापासून खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शिवार तयार ठेवले आहे. सोमवारपासून (ता.१) येथील रयत संपर्क केंद्रातर्फे सोयाबीन व इतर बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि शेताचा उतारा आवश्यक आहे. सदरची …
Read More »शाळेच्या छतांच्या दुरुस्तीवरून पीडीओंची झाडाझडती
तहसीलदार मुंजे यांची मानकापूरला भेट ; तात्काळ दुरुस्तीचे आदेश निपाणी (वार्ता) : दीड महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मानकापूर येथील सरकारी शाळेचे छत उडून जाण्यासह संरक्षण भिंत कोसळून इतर साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची सूचना तहसील प्रशासनाने संबंधित पिडिओ आणि …
Read More »शाळा प्रारंभोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम; उद्या होणार शाळांना प्रारंभ
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी आवश्यक निपाणी (वार्ता) : शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून (ता. २८) सुरुवात झाली आहे. पण शुक्रवारपासून आणि शनिवारी दोन दिवस शाळा स्वच्छतेची कामे झाल्याने सोमवारी (ता.१) विद्यार्थ्यांची शाळा सुरू होणार आहेत. दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतेविषयी काळजी घेऊन ठरलेल्या तारखेला शाळा सुरू केल्या जात आहेत. स्वच्छतेसाठी दोन …
Read More »हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची रयत संघटनेची मागणी
निपाणी (वार्ता) : दोन वर्षांपूर्वी निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात पदाधिकारी व संचालकांनी १८ कोटी रुपयेची ५० हजार क्वींटल साखरेची चोरी केली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले असून उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक …
Read More »काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी डी. के. शिवकुमार यांची निवड
बुधवारी लोकभवनात होणार शपथविधी बंगळूर : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची शनिवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आता शिवकुमार राज्यपालांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा सादर करतील. दरम्यान, बुधवारी (ता. ३) बंगळुरातील लोकभवनातील ‘ग्लास हाऊस’मध्ये हा …
Read More »निपाणीत नवविवाहितेची गळफासाने आत्महत्या
सासरकडून मानसिक छळाचा आरोप; सासूविरोधात पोलिसात तक्रार दाखल निपाणी (वार्ता) : सासरकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून लग्राच्या ३९ व्या दिवशी नवविवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना निपाणी येथे उघडकीस आली आहे. गुरुसिद्धवा प्रशांत हागरगी (वय ३६, रा. हरीनगर १ ली गल्ली, निपाणी) असे तिचे नाव आहे. घटनेची नोंद शहर …
Read More »चोरी करून विकलेले ४ लाखाचे मोबाईल दिले मालकांना; निपाणी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
निपाणी (वार्ता) : आठवडी बाजार, यात्रा, जत्रा बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा अनेकजण सोडून देतात. मात्र निपाणी ग्रामीण पोलिसांनी केंद्र सरकारच्या ‘सीईआयआर’ पोर्टलच्या मदतीने तब्बल ४ लाख रुपये किमतीचे २१ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत …
Read More »“वार्ताचा इम्पॅक्ट’ शिरगुप्पी ओढ्यातील कचऱ्याची जेसीबीद्वारे स्वच्छता; तलावात येणाऱ्या पाण्याला करून दिली वाट
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. शिवाय सध्या पुरवठा होणाऱ्या पाण्यामधून गाळ येत आहे. अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत शिरगुप्पी ओढ्यातून दरवर्षी येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर टाकाऊ वस्तु आणि झाडे झुडपे उगवली आहेत. पाऊस …
Read More »कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज; डी. के. शिवकुमार यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
बंगळुरू : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सत्तांतराच्या हालचालींना वेग आला असून कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज (शनिवार) सायंकाळी ४ वाजता विधानसौध येथे होणार आहे. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून औपचारिक निवड करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यपाल गेहलोत यांनी …
Read More »अर्धवट कामामुळे मानकापूरमध्ये अपघातांच्या संख्येत वाढ; ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील इचलकरंजी- हुपरी मार्गावरील माणकापूर बसस्थानक समोरच्या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाच्या प्रमाणात वाढ होत आहे. सदर बसस्थानक समोरच्या रस्त्यालगतच गेल्या दोन- अडीच महिन्यापासून गावातील गटारीच्या सांडपाणी निवारणासाठी चर खुदाई करून निघालेल्या मातीचे ढिगारे रस्त्यावरच टाकलेले आहेत. त्यामुळे सदर रस्ता अरुंद बनला असून या ठिकाणी वरचेवर वाहनांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta