Tuesday , November 24 2026
Breaking News

कर्नाटक

बोरगांव पीएमश्री सरकारी शाळेचे कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पीएमश्री सरकारी मराठी शाळा आता कर्नाटक सरकारकडून “कर्नाटक पब्लिक स्कूल” म्हणून अपग्रेड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून बोरगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून या शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी …

Read More »

द्रोण संघ डी. व्ही. पाटील स्मृती चषकाचा मानकरी

  कुरली संघाने पटकवले उपविजेतेपद ; क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दिवंगत माजी नगराध्यक्ष डी. व्ही. पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित पाचव्या पर्वातील डी. व्ही. पाटील स्मृती चषकावर निपाणीतील द्रोण संघाने आपले नाव कोरले. या संघाला रोख ५१ हजार रुपये आणि चषक देण्यात आले. …

Read More »

पावसाच्या अंदाजासाठी मदार विज्ञानावर, शेतकऱ्यांचा विश्वास आधुनिक साधनांवर

  निपाणी (वार्ता) : निपाणी पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी पावसाचा अंदाज निसर्गाच्या बदलावरून अचूक बांधत होते. पक्ष्यांचे आवाज वाऱ्याची दिशा, झाडाच्या शेड्यांवर बांधली जाणारी कावळ्यांची घरटी हे पावसाचे महत्त्वाचे संकेत मानले जात. बदलते वातावरण, वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे नैसर्गिक संकेत हळूहळू दुर्मीळ होत आहेत. शेतकऱ्यांची मदार आता …

Read More »

तब्बल 30 वर्षानंतर शाळेच्या उंबरठ्यावर….

  उत्तूर : जी मुले हाफ खाकी चड्डी आणि सफेद रंगाचे शर्ट, डोक्यावर गांधी टोपी आणि मुली पलकर झंपर आणि दोन वेण्या घालून शाळेत जायची. त्यांनी तीन दशकानंतर भरवला स्नेहमेळावा. पुन्हा शाळा घंटा वाजली आणि वर्ग भरला उत्सुकतेने आनंदाने आणि शिक्षकांच्यासह सारेच गहिवरले….. उत्तूर विद्यालय, उत्तूर शाळेच्या 1995-96 बॅचच्या मुला-मुलींनी …

Read More »

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे निपाणीत चाबूक मोर्चा

  विविध कार्यालयांना ठोकले टाळे ; आश्वासनानंतर आंदोलन मागे निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची निर्मिती करावी. तालुका पंचायत कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत. बेनाडी व मानकापूर गावातील रस्ते आणि गटारीच्या पाण्याचा निसरा करावा. याशिवाय तालुक्यातील विविध गावातील शेतक-यांच्या विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी कर्नाटक …

Read More »

बंधुभाव, एकतेचा संदेश देत निपाणी परिसरात बकरी ईद साजरी

    निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील इदगाह परिसरात अंजुमन कमिटी आणि मुस्लिम बांधवांतर्फे बकरी ईदचा सण गुरुवारी (ता.२८) उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता नेहरू चौकातील मशिदी जवळ एकत्र जमून मुस्लिम बांधवांनी ईदगाह परिसरात सामूहिक नमाज पठण करून अल्लाहची प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या देणार राजीनामा; डी. के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री

  बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण ‘ब्रेकफास्ट मीटिंग’मध्ये त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा निर्णय जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देखील त्यांच्या …

Read More »

हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा गुरुवारी अंतिम सामना

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित दिवंगत नगराध्यक्ष डी. व्ही. पाटील स्मृती चषक व निकु पाटील मित्र परिवारा तर्फे अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी (ता.२७) निपाणीतील स्पोर्ट्स विरुद्ध महादेव स्पोर्ट्स यांच्यात सामना झाला. त्यामध्ये महादेव स्पोर्ट्स क्लबने …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दुपारी राजीनामा देणार; चाहते संतप्त कर्नाटकच्या राजकारणात क्लायमॅक्स

  बंगळूर : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकाच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा अधिकृत निर्णय घेतला असून, गुरुवारी दुपारी ते राज्यपालांकडे राजीनामा सादर करणार असल्याचे समजते. राजभवनातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटीसाठी वेळ देण्यात आला असून, गुरुवारी दुपारी …

Read More »

पत्रकारितेतील योगदानाला सलाम; पत्रकार बांधवांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलराव पाटील यांचे सातवे पुण्यस्मरण

  संकेश्वर (पांडुरंग पाटील) : दिवंगत पत्रकार विठ्ठलराव पाटील यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त संकेश्वर येथील पत्रकार बांधवांच्या नेतृत्वाखाली विशेष स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता रुक्मिणी गार्डन येथे संपन्न होणार आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित, जनजागृती आणि लोकप्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या विठ्ठलराव पाटील …

Read More »