Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, तोपिनकट्टीत खो खो, कबड्डी स्पर्धेचे 18 ऑक्टोबर रोजी आयोजन

  खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथे खास दिवाळीच्या सणानिमित्त श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग यांच्यावतीने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने खो-खो व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खो खो स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत. विजयी संघांना पहिले बक्षीस रुपये. 21001, व ट्रॉफी,दुसरे …

Read More »

दसऱ्याच्या वाढीव सुट्टीमुळे निपाणी परिसरात गड, किल्ले तयार करण्यात बालचमू व्यस्त

  निपाणी (वार्ता) : यावर्षी शिक्षण खात्याने दसऱ्याची वाढीव सुट्टी दिल्याने निपाणी शहराच्या ग्रामीण भागातील रिकामे असलेले बालचमू चार-पाच दिवसांपासून गड-किल्ले साकारण्यात गुंतले होते. अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या असून सध्या त्यावर सैनिक ठेवण्यासह विद्युत रोषणाई केली जात आहे. शहरासह उपनगरांतील किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या आहेत. यंदा ३४ पेक्षा …

Read More »

डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘राजा शिवाजी’ संघ केएसपीएलमध्ये बेळगावचे नेतृत्व करणार

  खानापूर : कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट लीग केएसपीएल-२ स्पर्धेत ‘राजा शिवाजी’ हा संघ बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, ती आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केली जाणार आहे. ​माजी आमदार व कर्नाटक राज्य सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजली निंबाळकर या राजा शिवाजी संघाच्या मुख्य …

Read More »

भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थान, कार्यालयावर लोकायुक्तांचे छापे

  मोठ्या प्रमाणात अनधिकृत संपत्तीचा शोध बंगळूर : राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे छापे सुरूच आहेत. आज पहाटे राज्यभरात १२ ठिकाणी लोकायुक्तांनी छापे टाकले. लोकायुक्तांनी हसन, गुलबर्गा, चित्रदुर्ग, उडुपी, दावणगेरे, हावेरी, बागलकोट आणि बंगळुर शहरात छापे टाकून तपासणी केली. बंगळुरमध्ये तीन ठिकाणी लोकायुक्तांनी छापे टाकले आहेत. वैद्यकीय अधिकारी- मंजुनाथ, जी. व्ही. …

Read More »

गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तावडेंसह 3 आरोपींना जामीन मंजूर

  कोल्हापूर : कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कडून जामीन मंजूर झालाय. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज पर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 9 जणांना यापूर्वीच …

Read More »

हत्तरवाड येथील शेतकऱ्याला सर्पदंशाने मृत्यू

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथील एका शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून गणपती नारायण हलसकर (वय 52) असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती हलसकर हे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी, आपल्या शेतामध्ये काम करत असताना विषारी सर्पाने …

Read More »

खानापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री फोडली तब्बल 9 घरे

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी, गुंजी आणि सावरगाळी या तीन गावांतील तब्बल नऊ घरे चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री फोडली आहेत. या चोरट्यांनी सावरगाळीतील एका घरातून तब्बल पंधरा लाख रुपये रोख रक्कम, 16 तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे दागिने लंपास केले आहेत. सोमवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या असून …

Read More »

१८ हजार शिक्षकांच्या भरतीची लवकरच अधिसूचना : बंगारप्पा

  बंगळूर : शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सरकार लवकरच १८ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे, ज्यामध्ये अनुदानित शाळांसाठी ६,००० अतिथी शिक्षक आणि सरकारी शाळांसाठी १२,००० शिक्षकांचा समावेश आहे. शिमोगा प्रेस ट्रस्टने येथे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात बोलताना शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा म्हणाले …

Read More »

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर माजी आमदार अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड!

  बेळगाव : मागील 20 वर्षांपासून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निर्विवाद वर्चस्व असलेले माजी आमदार अरविंद पाटील यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार व विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा विजायोत्सव …

Read More »

शेतकऱ्यांचे हित जोपासणार असाल तर प्रति टन ४ हजार रुपये दर द्या : राजू पोवार

  कर्नाटक राज्य रयत संघटनेचे बैठक निपाणी (वार्ता) : सध्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधुम सुरू आहे. त्याच्याशी संघटनेचा कोणताही संबंध नाही. निपाणी तालुक्यातील दोन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना सहकार्य केलेले नाही. असे असताना आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढवीत असल्याचे सांगत आहेत. हे पूर्णपणे …

Read More »