Monday , September 21 2026
Breaking News

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची गुरुवारी सकाळी ९ वाजता नाष्टा पार्टी; उद्या राजीनामा शक्य

Spread the love

 

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानी मंत्र्यांसाठी नाष्टा पार्टीचे आयोजन केले असून, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीहून येऊन थेट यात सहभागी होतील.

डी. के. शिवकुमार यांच्या प्रवासाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले असून, ते गुरुवारी सकाळी ५.४५ वाजता नवी दिल्लीहून निघून सकाळी ८ वाजता बंगळूर विमानतळावर पोहोचतील. तेथून ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आयोजित केलेल्या नाष्टा पार्टीत थेट सहभागी होतील, असे प्रगती वाहिनीने म्हटले आहे.

नाष्ट्यानंतर, सिद्धरामय्या राज्यपालांना भेटून आपला राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्ष सायंकाळी बैठक घेऊन डी. के. शिवकुमार यांची पक्षाचे नवे नेते म्हणून निवड करण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरापासून नेतृत्वबदलावरून सुरू असलेला संभ्रम आता दूर झाला असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *