Monday , September 21 2026
Breaking News

विधान परिषदेच्या ७ जागांसाठी १८ जूनला निवडणूक

Spread the love

 

बंगळूर : राज्यातील सात विधान परिषद सदस्यांच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. येत्या १८ जून रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

विधान परिषद सदस्य गोविंद राजू, नासीर अहमद, एन. नागराजू, प्रतापसिंह नाईक के., तिप्पण्णप्पा, सुनील वल्यापूर आणि बी. के. हरिप्रसाद यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या सात जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जारी : १ जून २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ८ जून
अर्ज छाननी : ९ जून
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ११ जून
मतदान : १८ जून
मतदानाची वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी व निकाल : १८ जून २०२६

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *