Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रात शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे मिळालेल्या निधीतून निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना दोन सट गणवेशाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ९० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले असून शाळेच्या पहिल्या दिवशीच उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यातून समाधान व्यक्त होत आहे.
यंदा २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्राला लवकरच सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुदानीत शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या १५ हजार ८८४ विद्यार्थ्यांना आणि १६ हजार ३९६ विद्यार्थिनींना शाळेच्या गणवेश देण्यात येत आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासाठी कापड वितरित करण्यात येणार आहे.
शिवणकाम व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचेआव्हान शालेय व्यवस्थापन समित्यांसमोर असणार आहे.
पूर्वी स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून गणवेश शिवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यात अनेक तक्रारी आणि गोंधळ निर्माण झाल्याने दोन वर्षापासून पुन्हा शालेय व्यवस्थापन समित्यांनाच निधी वर्ग करून स्थानिक पातळीवर गणवेश खरेदी व शिवून घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. समग्र शिक्षा अभियान, पीएम श्री व राज्य गणवेश योजनेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जात आहेत. गणवेश विचारल्यानंतर शाळा सुरू होताच बूट व पायमोजे देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असल्याने शिक्षण विभागाने तयारीला वेग दिला आहे. मात्र, कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता शालेय व्यवस्थापन समित्यांवर येऊन ठेपली आहे.
——————————————————————-
‘यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी गणवेशाचा कोटा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी कार्यक्षेत्रातील सर्व शाळातील मुख्याध्यापकांना गणवेश वितरण करण्याचे सूचना दिली आहे. त्यानुसार वाटप सुरू असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.’
महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी निपाणी

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *