Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनला माजी विद्यार्थी व ज्येष्ठ शिक्षक यांची उदार देणगी

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. बळवंत पाटील तसेच ज्येष्ठ निवृत्त शिक्षक एस. आर. पाटील यांनी प्रत्येकी रोख रुपये २५,००० इतकी देणगी देऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
प्रा. बळवंत पाटील हे मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी असून सध्या जी.आय.टी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शालेय जीवनापासूनच ते अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. इयत्ता सातवीमध्ये त्यांनी गुणवत्ता परीक्षा उत्तीर्ण करून विशेष यश संपादन केले होते. त्यानंतरचे त्यांचे संपूर्ण शिक्षणही गुणवत्तेच्या आधारे पूर्ण झाले. आज उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या शाळेविषयी असलेले प्रेम आणि सामाजिक जाणीव जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही देणगी दिली आहे. तसेच एस. आर. पाटील हे निवृत्त शिक्षक असून त्यांनी आपल्या संपूर्ण शिक्षकी जीवनात अनेक गुणवंत व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी राहिले आहे. शिक्षणातून समाज घडविण्याची त्यांची भावना आजही कायम असून त्याच भावनेतून त्यांनी शाळेच्या विद्यार्थी दत्तक योजनेसाठी उदार देणगी दिली आहे. या दोन्ही मान्यवरांच्या योगदानामुळे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागणार असून त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शैक्षणिक समुपदेशक गौरी ओऊळकर, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, ज्येष्ठ शिक्षक बी.बी. शिंदे, डी. एस. मुतकेकर या सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.त्यांच्या कार्यातून समाजात शिक्षणासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *