Sunday , September 20 2026
Breaking News

स्कूल व्हॅनची १० टक्के दरवाढ अटळ

Spread the love

 

नवीन शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी; महागाईच्या आगीत तेल

निपाणी (वार्ता) : इंधन दरवाढीमुळे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शहर व परिसरातील स्कूल व्हॅन असोसिएशनने १० टक्के दरवाढीचे संकेत दिले आहेत. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच भरमसाठ शालेय शुल्काच्या कचाट्यात सापडलेल्या पालकांना आर्थिक फटका बसणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) चे विविध कर तसेच पेट्रोल, डिझेलच्या भरमसाठ वाढत असलेल्या किंमती यामुळे स्कूल व्हॅन आर्थिकदृष्ट्या चालविणे अवघड होत आहे. त्यामुळे यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रापासून १० टक्के दरवाढ करण्याचे असोसिएशनने ठरविले आहे.आरटीओ आणि शाळा पालक समिती यापुढे स्कूल बसचे दर ठरविणार आहे. आधीच स्कूल बस चालकांवर विविध नियम आणि अटी लादल्या आहेत. आता समिती आणि आरटीओ दर ठरवेल तर आमचा विचार कोण करणार? असा सवाल असोसिएशनने केला आहे.
——————————————————————–
‘मोठ्या शाळेच्या संस्थांना ४२ सीटरसाठी ४२ हजार तर आम्हाला ७ सीटरसाठी ७ हजार असा आरटीओकडून असा तफावती कर आकारण्यात येत आहे. खासगी संस्था चालकांच्या बसेसला २० वर्षे तर आम्हाला १५ वर्षे वाहनाची वयोमर्यादा ठरवून दिली आहे. शहर आणि ग्रामीण भागात ६० पेक्षा अधिक स्कूल व्हॅन असून त्यातील बहुतांश वाहनांची वयोमर्यादा संपत आली आहे. पुन्हा नवीन स्कूल बस घेणे परवडत नाही.
हुसेन मुल्ला, स्कूल व्हॅन चालक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *