Monday , September 21 2026
Breaking News

अल्पवयीन नवतेजचा विश्वविक्रम

Spread the love

 

बेळगाव : सावगाव रोड, बेळगाव येथील कुमार नवतेज भूषण पालकर (वय ३) याने “चित्रांशिवाय टेक्स्टमधून १५ फळे व प्राण्यांची नावे सर्वात जलद वाचणे” या प्रकारात अवघ्या ३० सेकंदांत कामगिरी पूर्ण करून जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.

या यशामुळे नवतेजची नोंद Worldwide Book of Records मध्ये करण्यात आली असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवतेजच्या या यशामागे त्याचे वडील भूषण पालकर आणि आई प्रज्ञा पालकर यांचे प्रेमळ संगोपन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन व अथक परिश्रम यांचा मोठा वाटा आहे. इतक्या लहान वयात मिळालेल्या या यशामुळे भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *