Sunday , July 26 2026
Breaking News

शिवानंद निलण्णावर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love

 

बेळगाव : बहुचर्चित ४,५०० कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद निलण्णावर यांना बुधवारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्यांनी निलण्णावर यांना दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. तपास यंत्रणेच्या मागणीचा विचार करून न्यायाधीश गंगाधर के. यांनी निलण्णावर यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला.

सुनावणीदरम्यान निलण्णावर यांनी छातीत वेदना व इतर आरोग्य समस्या असल्याचे सांगत योग्य उपचार मिळण्याची विनंती न्यायालयाकडे केली. यावर न्यायालयाने आरोग्य समस्या असल्यास वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार केले जातील, असे स्पष्ट केले.

न्यायालयाने सांगितले की, बीम्स रुग्णालयात चांगल्या उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यक असल्यास किम्स रुग्णालयातही उपचार घेता येतील. अधिक उपचारांची आवश्यकता भासल्यास वकिलांमार्फत अर्ज सादर करता येईल. तसेच कारागृहात आरोग्य समस्या निर्माण झाल्यास प्रशासन योग्य उपचार उपलब्ध करून देईल, असेही नमूद करण्यात आले.

दरम्यान, प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना न्यायालयाने निलण्णावर यांना दिल्या.

न्यायालयीन आदेशानंतर शिवानंद निलण्णावर यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *