Thursday , May 28 2026
Breaking News

बकरी ईदनिमित्त पोलिस यंत्रणा सतर्क

Spread the love

 

कडेकोट बंदोबस्त: पालिका प्रशासनातर्फे ईदगाह मैदानाची स्वच्छता

निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांचा ‘बकरी ईद’ सण गुरुवारी (ता. २८) साजरा होत.आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी शहर आणि ग्रामीण हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. याशिवाय शहर आणि ग्रामीण भागातील घडामोडींवरही बारकाईने लक्ष देऊन सतर्कता बाळगली आहे. पोलिसांच्या गोपनीय विभागाकडून सर्वत्र करडी नजर ठेवली आहे.
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. संवेदनशिल ठिकाणांची माहिती संकलित करून त्याठिकाणी जादा पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.शहर पोलिस विशेष शाखेकडून शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणारआहे. त्यासाठी जादा कुमकही पाचारण केली जाण्याची शक्यता आहे. मंडल पोलिस बी.एस. तलवार यांनी बकरी ईद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कुठल्या क्षणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
बेळगाव नाक्यावरील ईदगाह मैदानावर दर वर्षी रमजान आणि बकरी ईदचे सामुदायिक नमाजपठण होते. यंदाही गुरुवारी सकाळी ९ वाजता नमाजपठण होणार आहे. त्यानिमित्त विविध प्रकारची तयारी करण्यात आली आहे. चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार मॉन्सूनची प्रभावी सुरुवात होण्याची शक्यता असूनअचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. अशा स्थितीत खुल्या मैदानावर होणाऱ्या नमाजपठणात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मशिदींमध्ये नमाजची व्यवस्था होणार आहे. याशिवाय नगरपालिका प्रशासनातर्फे ईदगाह मैदानाची नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक विनायक जाधव, आकाश वाघेला, विशाल मधाळे, अविनाश माळगे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्याकडून स्वच्छता करण्यात आली आहे. याशिवाय पाण्याचे टँकर आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
——————————————————————–
बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह
ईद साजरी होण्यास अवघे एकच दिवस उरला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह आहे.नमाजच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्यास बकरी ईदच्या उत्साहात द्विगुणीत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रात शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मिळाले गणवेश

Spread the love  निपाणी (वार्ता) : सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे मिळालेल्या निधीतून निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *