Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

प्रगतीमध्ये मानवी मूल्ये, संस्कृतीची मूलभूत तत्त्वे जपावीत

  प्रा. तृप्ती करेकट्टी बागेवाडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र निपाणी (वार्ता) : साहित्य, संस्कृती आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. साहित्य मानवी मनाचे खरे स्वरूप प्रतिबिंबित करते. संस्कृती त्याची जीवनशैली ठरवते आणि तंत्रज्ञान त्या जीवनाला गती देते. या तीन घटकांचे संयोजन ही सध्याच्या युगातील आव्हानांना उत्तर देऊ …

Read More »

अन्नभाग्य योजनेत पाच किलो तांदळाऐवजी मिळणार ‘इंदिरा फूड किट’

                      कृषी, पर्यटनाला चालना देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अन्नभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा ५ किलो मोफत तांदूळ बंद करून त्याऐवजी ‘इंदिरा फूड किट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कृषी, …

Read More »

स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या लढ्याला यश…

  खानापूर : रंजिता प्रियदर्शनी व स्रीरोग्य तज्ञ असलेल्या खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या रजेचे धोरण लागू करून दरमहा एक दिवस पगारी सुट्टी द्यावी अशी मागणी वेळोवेळी सरकारकडे केली होती, पुढे जाऊन ही मागणी अनेक महिलांनी उचलून धरली. दरम्यान सिद्धरामय्या …

Read More »

राज्यात महिलांसाठी ‘मासिक पाळी रजा धोरण’ लागू

  मंत्रिमंडळाचा निर्णय; सर्व क्षेत्रांत धोरण लागू करणारे कर्नाटक पहिले राज्य बेंगळुरू : कर्नाटक सरकारने देशात पहिल्यांदाच महिलांसाठी मासिक पाळीच्या रजेचे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाअंतर्गत सर्व महिला कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवस पगारी रजा मिळणार आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व नियोक्त्यांना हे धोरण अनिवार्यपणे स्वीकारावे लागेल. …

Read More »

घराची भिंत कोसळून मजूर ठार; खानापूर तालुक्यातील रामापुर येथील दुर्दैवी घटना

  कक्केरी : खानापूर तालुक्यातील रामापूर या ठिकाणी घराची भिंत कोसळल्याने एक मजूर मरण पावला. सदर घटना आज सदर घटना आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामापुर गावातील फैयरोझखान, अयूबखान, देवडी यांच्या जुन्या घराचे छप्पर काढून भिंतीला पांढरं रंग देण्याचं काम सुरू असताना भींत …

Read More »

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीसाठी सहकाररत्न उत्तम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जिल्ह्यात सर्वच उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी बोरगाव येथी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी गुरुवारी (ता.९) मान्यवरांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उत्तम पाटील म्हणाले, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील …

Read More »

सरन्यायाधीशांवर बूट फेकी प्रकरणी बंगळुरात शून्य एफआयआर नोंद

  बंगळुर : सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीस्थित वकिलाविरुद्ध बंगळुर पोलिसांनी बुधवारी शून्य एफआयआर नोंदवला आहे. विधानसौध पोलिसांनी ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२ (सरकारी सेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि कलम १३३ …

Read More »

वन्यजीव हत्यांवर कठोर कारवाई होणार; मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  वन्यजीव सप्ताहाचा समारोप बंगळूर : राज्यात वन्यजीवांच्या हत्यांबाबत वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर इशारा दिला आहे. “वाघ, हत्ती किंवा कोणत्याही वन्यजीवांचा जीव घेणाऱ्यांविरुद्ध सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल,” असे ते बुधवारी म्हणाले. चामराजनगर जिल्ह्यातील माले महाडेश्वर टेकड्यांमध्ये दोन वाघ आणि चार पिल्लांना विषबाधा झाल्याची तसेच रामनगर जिल्ह्यातील चन्नपटण …

Read More »

निपाणी परिसरात शेतकरी बांधवातर्फे भूमी पौर्णिमा उत्सव साजरा

  निपाणी (वार्ता) : दसऱ्यानंतर शेतकरी बांधव भूमिपूजनाचा उत्सव साजरा करतात. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.८) हा कार्यक्रम पार पडला. सकाळी आठ वाजल्यापासूनच या कार्यक्रमाची शेतकऱ्याकडून तयारी सुरू झाली होती. वर्षभर अन्न पुरवणाऱ्या भूमी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. आधुनिकतेच्या युगातही शेतकरी अजूनही त्यांच्या शेतांवर अवलंबून आहेत. भूमी पूजन म्हणजे अन्न …

Read More »

पाकाळणी कार्यक्रमाने बाबा महाराज समाधीस अभिषेक घालून निपाणी उरुसाची सांगता

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री. संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित श्री. महान अवलिया हजरत पिराने पीर दस्तगीर साहेब(क. स्व) यांचा उरूस उत्सव शांततेत पार पडला. बुधवारी (ता.८) चव्हाण वाड्यातून चव्हाण वारस श्रीमंत रणजित देसाई -सरकार, श्रीमंत संग्राम देसाई -सरकार, श्रीमंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दर्गाह आणि बाहेरील …

Read More »