Monday , September 21 2026
Breaking News

नेसरीकर प्लॉट रेणुका मंदिर परिसरात ऑक्सिजन पार्क उभारणीचा शुभारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नेसरीकर प्लॉटमधील रेणुका मंदिर परिसरात नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी बगीचा निर्मिती उपक्रमाचा प्रारंभ भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी, परिसरात वाढते प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रत्येक भागात ऑक्सिजन पार्क निर्माण व्हावे, या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आपल्या प्रिय व्यक्तींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस तसेच स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करून लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभी करूया. प्रत्येक परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. याशिवाय चौगुले यांनी १० ते ११ फूट उंचीची वृक्षरोपे भेट देऊन उपक्रमाला हातभार लावला.
माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांनी, पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी मोठ्या उंचीची वृक्षरोपे देऊन बगीचा निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून या परिसरात आदर्श उद्यान उभारण्याचा प्रयत्न यशस्वी होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास जेम्स सत्तेगिरी, भगवंत कुरणे, रफिक शेख, मन्सूर मुल्ला, राजू चौगुले, राजू जत्राटे, निर्मला जाधव, शोभा जत्राटे, ललिता हनिमनाळे, संजय सोनटक्के, कृष्णात कांबळे, श्रावण कांबळे, आरती कांबळे, राणी देवरमणी, पूनम देवरमणी आदी उपस्थित होते. राजेंद्र शेटके यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *