Sunday , September 20 2026
Breaking News

सहकाररत्न उत्तम पाटील प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत ममदापूर केएल मधील साई स्पोर्ट्स क्लब विजेता

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : ममदापुर (के.एल.) येथील एस. टी. बॉइजतर्फे उत्तम पाटील प्रीमियर लिग २०२६ मधील चौथ्या पर्वातील क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये ममदापूर (के.ए.) येथील साई स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांकाचे २५ हजार रुपये आणि चषक पटकाविले. सहकाररत्न उत्तम पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीसे देण्यात आली.
स्पर्धेतसरकार वॉरियर्स द्वितीय क्रमांक पटकावून १० हजार रुपये आणि चषक, दाजी लायन्स स्पोर्ट्स क्लबने तृतीय क्रमांक पटकावून ७ हजार रुपये आणि चषक, आर. डी. स्पोर्ट्स क्लबने तृतीय क्रमांक मिळवून ‌३ हजार रुपयाचे बक्षीस पटकाविले. याशिवाय बेस्ट बॅट्समन साईराज पाटील, बेस्ट बॉलर धीरज बामणे मॅन ऑफ द सिरीज म्हणून साईराज पाटील यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचतर्फे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निरंजन पाटील- सरकार, गजानन कावडकर, प्रकाश पाटील, संतोष उर्फ छोटू गोरवाडे, दत्ताजी देवर्डेकर, संभाजी पाटील, संतोष उर्फ दादा पाटील, उत्तम दादू पाटील यांच्यासह ममदापूर येथील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, माजी ग्राम पंचायत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व संघ मालक, खेळाडू, क्रिकेटप्रेमी, उत्तम पाटील प्रेमी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *