Sunday , September 20 2026
Breaking News

डंपर – दुचाकी अपघातात रांगोळीचा युवक ठार; मानकापूर जवळील घटना

Spread the love

निपाणी (वार्ता) : कारदगा-मानकापूर फाट्याजवळ डंपर व मोटारसायकलची धडक होऊन रांगोळी येथील महाविद्यालय विद्यार्थी ठार झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. गणेश बाबासाहेब कांबळे (वय १८) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अर्जुन रमेश मिरजे (वय १८) साहिल कुबेर कांबळे (तिघेही रा. रांगोळी) गंभीर जखमी झाले आहेत. अर्जुन मिरजे यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गणेश कांबळे, अर्जुन मिरजे, साहिल कांबळे हे तिघे बारावीचे गुणपत्रक आणण्यासाठी इचलकरंजीला दुचाकीवरून (क्रमांक एम. एच. ०९५६) गेले होते. दुचाकी रांगोळीकडे येत असताना मुरुमाने भरलेला डंपर (एमएच ५१- सी – १२४२) इलकरंजीकडे जात होता. दुचाकी व डंपरची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकीवरील तिघे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यावेळी नागरिकांनी त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात घेऊन गेले असता गणेश कांबळे याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अर्जुन मिरजे याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवलले असून प्रकृती चिंताजनक आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *