Sunday , September 20 2026
Breaking News

बोरगांव पीएमश्री सरकारी शाळेचे कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पीएमश्री सरकारी मराठी शाळा आता कर्नाटक सरकारकडून “कर्नाटक पब्लिक स्कूल” म्हणून अपग्रेड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून बोरगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक वर्षांपासून या शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असून शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राहिली आहे.दोन वर्षांपूर्वी या शाळेला पीएमश्री शाळेचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यानंतर शाळा परिसर, वर्गखोल्या, शैक्षणिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. शिस्तबद्ध वातावरण, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यामुळे शाळेची ओळख अधिक बळकट झाली. याच कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने आता या शाळेला कर्नाटक पब्लिक स्कूल म्हणून मंजुरी दिली आहे.
या मंजुरीमुळे शाळेला शासनाच्या विविध सुविधा उपलब्ध होणार असून एलकेजीपासून प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, पाठ्यपुस्तके, गणवेश, मध्यान्ह आहार यांसह संगीत, कला, संगणक शिक्षण अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच अनुभवी व गुणवंत शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.
शाळा सुधारणा समितीचे कार्यही उल्लेखनीय असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या शाळेत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन एसीडीएमसीचे अध्यक्ष शिवाजी भोरे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *