Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीत नवविवाहितेची गळफासाने आत्महत्या

Spread the love

 

सासरकडून मानसिक छळाचा आरोप; सासूविरोधात पोलिसात तक्रार दाखल

निपाणी (वार्ता) : सासरकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून लग्राच्या ३९ व्या दिवशी नवविवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना निपाणी येथे उघडकीस आली आहे. गुरुसिद्धवा प्रशांत हागरगी (वय ३६, रा. हरीनगर १ ली गल्ली, निपाणी) असे तिचे नाव आहे. घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली असून याबाबत गुरुसिद्धवा यांच्या बहिणीने सासू विरोधात तक्रारदिली आहे.
गुरुसिद्धवा हिचा विवाह प्रशांत हागरगी याच्याशी २१ एप्रिल रोजी निपाणीत झाला होता. विवाहानंतर १५ दिवसांनी सासू महानंदा अशोक हागरगी यांनी तिचा मानसिक छळ सुरू केला सुरू केला. गुरुसिद्धवा हगरगी या नवविवाहितेने याबाबतचीमाहिती आपल्या माहेरच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर मध्यस्था कडून वाद मिटवण्यात आलाहोता. तरीसुद्धा गुरुसिद्धवा हिचा मानसिक छळ सुरूच होता. गुरुसिद्धवा हिने पती प्रशांत हा कागल औद्योगिक वसाहतीमध्ये नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास साडीने गळफास घेतला. तत्पूर्वी तिनेरात्री अकाराच्या सुमारास आपल्या भाचीला मी जीवाचे बरेवाईट करूनघेणार असल्याचा मेसेज मोबाईलवर केला होता. दरम्यान, पहाटे ४ च्यासुमारास भाचीने तो मेसेज बघून गुरुसिद्धवा हिच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याची प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याने पती प्रशांत याच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार प्रशांतने घरच्यांशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली असता नेमका प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार बसवराज नेर्ली यांनी पाहणी केली. गुरुसिद्धवा हिची बहीण सुनंदा दुंडाप्पा उप्पार (रा. विजापूर) हिने सासू महानंदा हागरगी हिच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *