Monday , September 21 2026
Breaking News

शाळेच्या छतांच्या दुरुस्तीवरून पीडीओंची झाडाझडती

Spread the love

 

तहसीलदार मुंजे यांची मानकापूरला भेट ; तात्काळ दुरुस्तीचे आदेश

निपाणी (वार्ता) : दीड महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मानकापूर येथील सरकारी शाळेचे छत उडून जाण्यासह संरक्षण भिंत कोसळून इतर साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची सूचना तहसील प्रशासनाने संबंधित पिडिओ आणि सीआरपीना केल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने तहसीलदार सुरेश मुंजे आणि तालुका पंचायत कारनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी यांनी मानकापूर शाळेला भेट देऊन छताची दुरुस्ती न केल्याने संबंधितांना धारेवर धरून त्यांची कान उघाडणी केली.
सोमवारपासून (ता. १ जून) सर्वत्र शाळांना प्रारंभ होणार आहे. त्यापासून वर बहुतांश शाळांमध्ये स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत. अशा परिस्थितीत वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान झालेल्या छतांची दुरुस्ती न केल्याने अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थासह पालकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या दुरुस्तीचे आदेश दिले असले तरी काम होण्यासाठी किमान चार-पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत विद्यार्थी कुठे बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तहसीलदार मुंजे म्हणाले, वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान झालेल्या छतांची दुरुस्ती करण्याची सूचना यापूर्वी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तात्काळ काम करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले. यावेळी ‌ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे,रयत संघटनेचे निपाणी तालुका उपाध्यक्ष बबन जामदार, शाखा अध्यक्ष पवनकुमार माने, ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार, प्रमोद शेवाळे, विकास वराळे, लक्ष्मण माने, राहुल वराळे यांच्यासह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *