Monday , September 21 2026
Breaking News

शाळा प्रारंभोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम; उद्या होणार शाळांना प्रारंभ

Spread the love

 

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी आवश्यक

निपाणी (वार्ता) : शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून (ता. २८) सुरुवात झाली आहे. पण शुक्रवारपासून आणि शनिवारी दोन दिवस शाळा स्वच्छतेची कामे झाल्याने सोमवारी (ता.१) विद्यार्थ्यांची शाळा सुरू होणार आहेत.
दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतेविषयी काळजी घेऊन ठरलेल्या तारखेला शाळा सुरू केल्या जात आहेत. स्वच्छतेसाठी दोन दिवस शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. त्यामुळे सोमवार (ता. ३१) पासून विद्यार्थी शाळेला येणार आहेत. सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने काही शाळांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, पाठ्यपुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत केले जाणार आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये बाहेरील मजुरांना सांगून शाळा आणि परिसरातील स्वच्छता करून घेण्यात आली.या स्वच्छतेमध्ये वर्गखोल्या, शाळेचा परिसर, पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभांची स्वच्छता, शाळा शौचालयाची स्वच्छता केली आहे.याशिवाय खराब झालेले साहित्य काढून तेथे नव्या साहित्याची मांडणी केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
——————————————————————-
‘सोमवारपासून (ता.१) प्रत्यक्षात शाळा सुरू होणार आहे. तरी सुट्टीच्या काळातील वर्गखोल्यांची स्वच्छता करण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी दिला. त्यांची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. सोमवार (ता. १) पासून शाळा सुरू होणार आहेत. या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी आवश्यक आहे.’
महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *