Sunday , July 26 2026
Breaking News

हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची रयत संघटनेची मागणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : दोन वर्षांपूर्वी निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात पदाधिकारी व संचालकांनी १८ कोटी रुपयेची ५० हजार क्वींटल साखरेची चोरी केली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले असून उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही संबंधित संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे करण्यात आले आहे. चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयते संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे.
राजू पोवार यांनी दिलेली माहिती अशी, दोन वर्षापूर्वी येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यातील साखर चोरीची घटना उघडकीस आली आहे. साखर चोरी प्रकरणी उच्च न्यायालयाने कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष, सर्व संचालकांना दोषी ठरवले होते.‌ त्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर अरेस्ट वाँरंट काढले आहे. तरीही पोलीस यंत्रणेने संशयित आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि रयत संघटनेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य गौरवाध्यक्ष शशीकांत पडसलगी यांनी, साखर चोरीचा घोटाळा मोठा असून संशयित आरोपींना तात्काळ अटक न केल्यास जिल्हा पातळीवर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी, आपल्याकडे अटक वाँरंट मिळाल्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्याची ग्वाही दिली. तरीही अटक न झाल्यास जिल्हा पोलीस कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पोवार यांनी दिला असल्याचे सांगितले.
यावेळी किसन नंदी, मंजू पुजारी, मल्लाप्पा अंगडी, अशोक क्षीरसागर, सूर्याजी पोटले, प्रकाश नाईक, महेश सुभेदार, मधुकर पाटील, प्रेम चौगुला, शिवानंद मुगलीहाळ, पांडू बिरनगड्डे, बाबुराव खोत, एकनाथ सादळकर, विश्वास आबणे, कलगोंडा कोटगे, सिद्धाप्पा मिरजे, प्रकाश नुले, आनंदा गायकवाड यांच्यासह पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर, तहसीलदार सुरेश मुंजे, यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *