Sunday , July 26 2026
Breaking News

हाजगोळी येथे बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात एचईआरएफ रेस्क्यू टीमला यश

Spread the love

 

बेळगाव : हाजगोळी येथील डॅम परिसरात पाण्यात बुडालेल्या बेळगावच्या २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल १८ ते २० फूट खोल पाण्यातून बाहेर काढण्यात हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन (HERF) च्या पथकाला यश आले. रात्रभर सुरू असलेल्या अथक शोधमोहीमेनंतर ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार नामदेव पाटील (वय २२) हा युवक शनिवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हाजगोळी डॅम परिसरात पाण्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन (HERF)चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी युवकाचे कपडे आणि बोट किनाऱ्यावर आढळून आले होते. मात्र तो नेमक्या कोणत्या ठिकाणी बुडाला याची स्पष्ट माहिती नसल्याने शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. अंधार, खोल पाणी आणि मर्यादित माहिती या अडचणींवर मात करत HERF च्या टीमने अत्याधुनिक अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू ठेवली.

रात्री उशिरा युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तेथे पाण्याची खोली सुमारे १८ ते २० फूट असल्याने तो बाहेर काढणे अत्यंत कठीण ठरत होते. तरीही रेस्क्यू टीमने धैर्य आणि चिकाटी दाखवत शोधकार्य सुरू ठेवले.

अखेर सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ओंकार पाटील यांचा मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या मोहिमेदरम्यान HERF च्या रेस्क्यू टीमने दाखविलेल्या तत्परतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *