Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात आज वधू-वर, पालक परिचय महामेळावा

Spread the love

 

बेळगाव : विवाह इच्छुक युवक-युवतींना योग्य जोडीदार शोधण्यासाठी तसेच पालकांना एकाच ठिकाणी परिचयाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज, रविवार दि. 31 मे 2026 रोजी बेळगाव येथे वधू-वर, पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भडकल गल्ली येथील बालाजी वधूवर सूचक केंद्र यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सदर महामेळावा सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत गोवावेस खाऊकट्टासमोरील हॉटेल मधूबन येथे पार पडणार आहे. विवाहासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसह त्यांच्या पालकांना संवाद आणि परिचयाची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

आयोजकांच्या माहितीनुसार, प्रथम विवाह इच्छुकांसोबतच घटस्फोटित, विधवा-विधुर, प्रौढ तसेच आंतरजातीय विवाह इच्छुकांसाठीही हा महामेळावा उपयुक्त ठरणार आहे. विविध पार्श्वभूमीतील विवाह इच्छुकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.

महामेळाव्यासाठी आगाऊ नोंदणी सुरू असून नोंदणी शुल्क 1,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. सहभागींसाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 6364775513 किंवा 9008966941 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विवाह जुळवणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेला हा महामेळावा विवाह इच्छुक आणि पालकांसाठी एक महत्त्वाची संधी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *