Monday , September 21 2026
Breaking News

बिजगर्णीत 2 व 3 जून रोजी श्री भावकाई देवी यात्रोत्सव; धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री भावकाई देवी यात्रोत्सवाचे आयोजन मंगळवार, दि. 2 जून ते बुधवार, दि. 3 जून 2026 या कालावधीत करण्यात आले आहे. यात्रोत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

बिजगर्णी येथील श्री भावकाई देवी मोरे (बंधू) यात्रा उत्सव कमिटी तसेच श्री भावकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज रविवारी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून मंदिराला आकर्षक सजावट व रंगरंगोटी करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी, मंगळवार दि. 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून गोंधळ व विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून हे कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुसऱ्या दिवशी, बुधवार दि. 3 जून रोजी ओटी भरणे, गाऱ्हाणे, भरयात्रा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर यात्रोत्सवाची सांगता होईल. स्वच्छता अभियानावेळी रामचंद्र मोरे, शंकर मोरे, महादेव मोरे, अरविंद मोरे, संदीप मोरे, भावकू मोरे, बबन मोरे, परशुराम मोरे, आपाजी मोरे, महेश मोरे, संजय मोरे, सागर मोरे, तुकाराम मोरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *