Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

ज्वारीच्या पिकं व झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी; 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी

  निपाणी : निपाणी समाधीमठ रोड सुतार ओढा शेजारी असणारी मधुसूदन (राजन) शंकरराव चिकोडे यांच्या पिकाऊ शेत जमीन मधील कापुन ठेवलेली ज्वारी व कडबा यास आज दुपारी 2 वाजणेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे जवळपास 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी शेतकरी रयत यांची झाली आहे. या परिसरात गुंठेवारी प्लाॅट …

Read More »

चिक्कोडी आर. डी. हायस्कूलच्या मतमोजणी केंद्राला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट

  मतमोजणी सुरळीत, शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडा: जिल्हाधिकारी नितेश पाटील चिक्कोडी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भात चिक्कोडी आर. डी. हायस्कूलच्या मतमोजणी केंद्राला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. चिक्कोडी लोकसभा मतदान केंद्रातील विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूम्सना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व मतमोजणी …

Read More »

कर्नाटकात ‘घराणेशाही’चा सर्वपक्षीय उदो उदो..!

  बंगळुरू : कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहेत. या निवडणुकीसाठीचे सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून या पक्षांनी घराणेशाहीला विरोध करण्याऐवजी उदो उदो करीत आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या. दुसऱ्या यादीमध्ये राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ …

Read More »

कर्नाटक रयत संघटनेची महाराष्ट्रात धाव

  जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने लोकसभेच्या मैदानात निपाणी (वार्ता) : भादोले, (ता. हातकणगले) येथे भटक्या विमुक्त संघटना, यशवंत क्रांती संघटना, जिद्द बांधकाम कामगार संघटना, नरवीर उमाजी नाईक संघटना, बळीराजा पार्टी आणि कर्नाटकमधून रयत संघटना आदींनी एकत्र येऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांचे नाव …

Read More »

कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूर म. ए. समिती निवडणूक लढविणार!

  खानापूर : निवडणुका हा सीमालढ्याचा एक भाग आहे. म्हणूनच समितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच मराठी भाषिकांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी समितीला निवडणूक लढवावीच लागेल, असा सुर युवा कार्यकर्त्यातून उमटत असल्यामुळे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने यंदाची लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार …

Read More »

निपाणीतील ‘फॅशन उमंग’ कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : येथील एमआयटी संस्थे तर्फे येथील महर्षी वाल्मिकी समुदाय भावनांमध्ये ‘फॅशन उमंग’ आणि वेशभूषा प्रदर्शन कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील घाळी कॉलेजचे मानसशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील उपस्थित होते. संस्थेच्या प्रमुख पद्मिनी मोरबाळे यांनी, सलग आठ वर्षे शहरात ‘फॅशन उमंग’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात …

Read More »

निपाणीत आचार्य श्री. आर्यनंदी गुरुदेव यांची जयंती

  निपाणी (वार्ता) : येथील १००८ आदिनाथ सैतवळ जैन मंदिल आणि अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था,शाखा कर्नाटक विभाग आयोजित तीर्थरक्षा शिरोमणी १०८आचार्यश्री आर्यनंदि गूरूदेव यांच्या ११७ जन्मोत्सवानिमित्त शेतवाळ गल्ली जैन मंदिर येथे वात्सल्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रतिमेचे पूजन, जयमाला व आरती करून झाल्यानंतर १००८ आदिनाथ जैन सैतवळ मंदिराच्या …

Read More »

खानापूरजवळ भीषण अपघात : के. एस. देशपांडे यांचा मृत्यू

  खानापूर  : बागलकोट शहर विकास प्राधिकरणाचे कायदेशीर सल्लागार, ज्येष्ठ वकील आणि ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष के. एस. देशपांडे यांचा खानापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ते 72 वर्षांचे होते. कुटुंबासह दांडेली येथे २ दिवसांच्या सहलीला जात असताना कारचा अपघात झाला. मुलगा सागर देशपांडे हे गाडी चालवत होते. त्यांचे गाडीवरील नियंत्रण …

Read More »

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर अभिनंदन पाटील यांची निवड

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष, साखर व्यवसायातील उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांची बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर खासगी तत्त्वावरील विभागात सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे. सन २०२४-२५ ते २०२८-२९ या सालासाठी ही निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी एम. एन. मणी यांनी सांगितले. चिक्कोडी …

Read More »

खानापुरात लाच स्वीकारणारा अभियंता लोकायुक्तांच्या जाळ्यात

  खानापूर : सरकारी कामासाठी दहा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा पंचायत खानापूरचे असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर (A E E.) डी एम बन्नूर यांना बेळगाव लोकायुक्त पोलिसांनी खिसे गरम करताना रंगेहाथ पकडले. लाच घेताना हाती लागलेल्या बन्नूर यांची कसून चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात …

Read More »