नवी दिल्ली : देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनकड यांनी गुरुवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून त्यांनी ही शपथ घेतली. अलिकडेच पार पडलेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार धनकड यांनी विरोधी गोटाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. धनकड …
Read More »स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी जम्मू झोनचे …
Read More »मुख्यमंत्री नितीश कुमार 24 ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव मांडणार!
पाटणा : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. याच मंत्रिमंडळ बैठकीत 24 ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारच्या नव्या सरकारमध्ये 24 आणि 25 ऑगस्टला बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून …
Read More »पश्चिम बंगालमध्ये बस -ऑटोचा भीषण अपघात; ९ जण जागीच ठार
बीरभूम : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात मंगळवारी (ता. ९) मोठी दुर्घटना घडली. बीरभूममध्ये बस व ऑटो यांच्यात झालेल्या धडकेत ऑटोतील नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना राणीगंज-मोरग्राम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० जवळील रामपूरहाट पोलिस ठाण्याच्या तेलदा गावाजवळ घडली. ऑटोमधील प्रवासी भात लावणीचे काम आटोपून गावाकडे परतत होते. अपघाताची माहिती …
Read More »बिहारमध्ये राजकीय भूकंप; जेडीयू एनडीएमधून बाहेर
पाटणा: बिहारच्या राजकारणात भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएसोबत असणारी युती तोडली आहे. नितीश कुमार यांनी भाजपला दे धक्का दिल्यानंतर आता बिहारमधील राजकीय समीकरणं बलणार आहेत. थोड्याच वेळात नितीश कुमार राज्यपालांची भेट घेणार आहेत. आज नितीश कुमारांच्या घरी खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नितीश …
Read More »शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकेवर आत्ता १२ ऑगस्टला सुनावणी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन सव्वा महिना लोटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. यावरून विरोधक शिंदे-भाजप सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. …
Read More »रामायणावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली चक्क दोन मुस्लिम विद्यार्थ्यांनी!
कोझिकोड : केरळच्या मलप्पुरममधील दोन मुस्लिम विद्यार्थ्यांनी रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोहम्मद जबीर पी के आणि मोहम्मद बासिथ एम हे अव्वल ठरले आहेत. या स्पर्धेत १ हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अव्वल ठरलेले दोघे …
Read More »उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज
मार्गारेट अल्वा की जगदीप धनखड नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड आहेत. त्याचवेळी विरोधकांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी …
Read More »महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन : राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात …
Read More »व्याजदरांमध्ये आरबीआयकडून अर्ध्या टक्क्याची वाढ; गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 5.4 टक्के इतका झाला आहे. शुक्रवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा जीडीपीची वाढ 7.2 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta