Thursday , June 4 2026
Breaking News

स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

Spread the love

 

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी

जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, “राजौरीतील परगल, दारहाल भागातील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दारहाळ पोलिस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात दोन दहशतवादी ठार झाले असून लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.

दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना हाणून पाडले

स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवण्यासाठी दहशतवादी संघटना सतत एखादी मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना ठामपणे हाणून पाडत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशाने निधन

Spread the love  खानापूर : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे सक्रिय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *