बेळगाव : गोरगरीब जनता बचत करून पैसे संस्थेमध्ये ठेवते. त्यामुळे या पैशांचा योग्य विनिमय करून त्याचा मोबदला ठेवीदारांना देणे गरजेचे आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता असणेही आवश्यक आहे, संस्थेच्या संचालकांची ठेवीदार, सभासदांना विश्वासात घेऊन कार्य केले तरच संस्था विश्वासास पात्र ठरेल आणि संस्था प्रगतीपथावर जाईल, असे प्रतिपादन काकती येथील मार्कंडेय …
Read More »कपिलेश्वर मंदिराजवळील तलावात आढळला भांदूर गल्लीतील युवकाचा मृतदेह
बेळगाव : कपिलेश्वर मंदिराजवळील तलावात एकाचा मृतदेह रविवारी सकाळी आढळला. सचिन पाटील (वय ४६, रा. भांदूर गल्ली, बेळगाव) असे या युवकाचे नाव आहे. सचिन हा अविवाहित होता. कपिलेश्वर मंदिराजवळील तलावात एकाचा मृतदेह तरंगताना दिसला. यामुळे आजूबाजूच्या लोकांनी खडेबाजार पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा …
Read More »“ऑल इज वेल” चित्रपटाचे कलाकार उद्या बेळगावात
बेळगाव : वाणीश्री फिल्म प्रोडक्शन निर्मित बेळगाव यांच्या 27 जून पासून सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचे सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते मंगळवार दिनांक 24 जून रोजी बेळगाव शहराला भेट देणार असून त्यांची बेळगाव शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाणीश्री फिल्म प्रोडक्शन …
Read More »गांजा विक्री प्रकरणी तीन आरोपींना अटक
बेळगाव : बेळगावमध्ये दोन वेगवेगळ्या बेकायदेशीर गांजा विक्री प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून एक किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांची नावे उमेश सुरेश उरुबिनत्ती, वर्धन अनंत कांबळे आणि पार्थ रमेश गोवेकर अशी आहेत. आरोपी उमेश बेळगावमधील भरतेश शाळेसमोरील सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गांजा …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 24 जून 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. मध्यवर्ती समितीच्या सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले आहे.
Read More »माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा अमृतमहोत्सव आयोजनासंदर्भात बैठक
बेळगाव : बेळगावच्या सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे माजी नगरसेवक श्री. नेताजी नारायणराव जाधव यांचा अमृतमहोत्सव करण्यासंदर्भात त्यांच्या हितचिंतकांची एक बैठक आज मराठा मंदिर खानापूर रोड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे हे होते. प्रारंभी माजी महापौर …
Read More »म. ए. समिती शहापूर यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर आणि कोरे गल्ली पंच मंडळाकडून शहापूर भागातील गुणवंत विद्यार्थीसह क्रीडास्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीचे सरपंच सोमनाथ कुंडेकर, प्रमुख पाहुणे मदन बामणे, नेताजी जाधव, राजकुमार बोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन आणि गणेश पूजनाने पाहुण्याच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आणि जिल्ह्यात …
Read More »संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
बेळगाव : २१ जून रोजी आदर्श नगर येथील संजीवीनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे ६०हून अधिक काळजी केंद्रातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला आणि प्राचीन भारतीय योगशास्त्राचे धडे गिरविले. मुळात काळजी केंद्रातील मानसिक रुग्णांची शारीरिक आणि मानसिक पातळी उंचावण्यासाठी कायमस्वरूपी रोज सकाळी योगाभ्यास …
Read More »हरिनामाच्या गजरात धामणे गावची दिंडी वारकरी आषाढी वारीसाठी मार्गस्थ….
बेळगाव : भेटी लागे जीवा सावळा श्रीरंग.. दरवर्षी बेळगावसह सीमाभागातून हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला वारीत सहभागी होण्यासाठी जात असतात. तसेच अनेक वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज धामणे …
Read More »बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट!
बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आले आहे. आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे आणि एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भूषण गुलाबराव बोरसे यांच्या नावाने गुन्हेगारांनी बनावट खाते उघडले आहे. बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्यास थोडा वेळ लागतो. “बी. भूषण गुलाबराव” …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta