Monday , April 20 2026
Breaking News

कै. अशोकराव मोदगेकर हे तळागाळातील लोकांच्या विकासाचा वेध घेणारे व्यक्तिमत्त्व!

Spread the love

बेळगाव : कै. अशोकराव मोदगेकर यांनी आपले जीवन लोक हित डोळ्यासमोर ठेवून व्यतीत केले. त्यांचे राहणीमान सुख सोयीन समृद्ध होतं पण वैयक्तिक सुखात रमण्यापेक्षा समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांनी धन्य मानलं. मुख्यतः मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं किंवा गोरगरिबांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणं व यासाठी अनेक संकटांना धाडसाने सामोरे जाणं हे त्यांचे कार्य भावी पिढीला प्रेरित करणारे आहे, अशा भावना त्यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या.

रणझुंझार शिक्षण संस्था व रणझुंझार सहकारी संस्था निलजी यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांचा पाचव्या स्मृतिदिन नुकताच रणझुंझार हायस्कूलच्या सभागृहात गांभीर्याने पाळण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश धानगावडे होते.
या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या ईशस्तवनाने केली. कै. अशोकराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रकाश धानगावडे यांनी केले तर मान्यवरांनी प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली. रणझुंझार विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सोमनाथ कुरंगी यांनी प्रास्ताविकातून मोदगेकरांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. रमेशराव मोदगेकर, कु. सौजन्या जत्राटी,अमर मोदगेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांच्या स्मरणार्थ शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा (स्मरणशक्ती पाढे पाठांतर निबंध लेखन धार्मिक पठण प्रश्नमंजुषा) अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांची बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब मोदगेकर, निखिल मोदगेकर, मारुती गाडेकर, सिद्राय वर्पे, वसंत पाटील, यल्लाप्पा मोदगेकर, लक्ष्मण गोमानाचे, कु. तेजस्वि मोदगेकर, मुख्याध्यापक वाय.पी. पावले आणि विश्वस्त मंडळ, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका सुप्रिया कदम आणि आभार रणझुंझार कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता अक्षिमणी यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *