Tuesday , November 24 2026
Breaking News

बेळगाव

‘चला खेळूया मंगळागौर 2026’ द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सव 8 व 9 ऑगस्टला

  बेळगाव : महिलांमधील पारंपरिक संस्कृती, कला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सखी ग्रुप, बेळगाव यांच्या वतीने ‘चला खेळूया मंगळागौर 2026’ या द्विदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 8 व 9 ऑगस्ट 2026 रोजी गुजरात भवन, शास्त्रीनगर, बेळगाव येथे उत्साहात पार पडणार आहे. महोत्सवात महिलांसाठी पारंपरिक मंगळागौर …

Read More »

अध्यक्षपदाच्या निवडीवरून बेळगाव काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

  शहराध्यक्ष निवडीसाठी सुरू असलेल्या मतमतांतर बैठकीत वाद; पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली बेळगाव : कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या जिल्हा व शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू असताना, बेळगाव शहर काँग्रेस कार्यालयात अध्यक्षपदाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. संगोळी रायण्णा चौकातील काँग्रेस कार्यालयात एआयसीसीचे निरीक्षक मनोज चव्हाण यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष …

Read More »

बेळगावच्या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या दिशेने निर्णायक पाऊल; धर्मवीर संभाजी चौकात जिओ-टेक्निकल तपासणीला प्रारंभ

  बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बहुचर्चित उड्डाणपूल प्रकल्पाच्या उभारणीच्या दिशेने अखेर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. धर्मवीर संभाजी चौक येथे मागील दोन दिवसांपासून बॅरिकेड्स उभारून जिओ-टेक्निकल तपासणी आणि माती परीक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, त्यामुळे प्रत्यक्ष उड्डाणपूल उभारणीच्या कामाला …

Read More »

हिरेबागेवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांना अटक, १ लाख २२ हजारांची रोकड जप्त

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील शगणमट्टी लीफ फार्मजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १० जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २२ हजार १६ रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी काही जण पैशांची पैज लावून ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार खेळत असल्याची …

Read More »

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त; ६० दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश

  बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतील (BDFA) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय वादावर अखेर पडदा पडला आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेने (KSFA) विद्यमान बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त करून हंगामी समितीची नियुक्ती केली असून, पुढील ६० दिवसांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या व्यवस्थापन मंडळाच्या …

Read More »

कोरे गल्ली पंच मंडळ व महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

  बेळगाव : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली कोरे गल्ली पंच मंडळ संस्था आणि महाराष्ट्र्र एकीकरण समिती कोरे गल्ली, रामलिंगवडी शहापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील १० वी आणि १२ वी (पीयूसी) गुणवंत विध्यर्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कोरे गल्ली पंच मंडळाचे सोमनाथ कुंडेकर अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख व्यक्ते …

Read More »

सीमालढा अधिक तीव्र होणार! न्यायालयासह राजकीय पातळीवर मध्यवर्ती म. ए. समितीची रणनीती

    सीमा समन्वय मंत्र्यांची लवकरच भेट; सुनावणीला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला निर्णायक टप्प्यावर नेण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता न्यायालयीन लढाईबरोबरच राजकीय आघाडीवरही आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित दाव्याच्या सुनावणीला गती मिळावी, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमधील लोकप्रतिनिधींवर सातत्याने दबाव वाढविण्याचा …

Read More »

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे अग्निवीर भरती मेळावा

  बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे युनिट मुख्यालय कोटा (UHQ) अंतर्गत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक (क्लर्क) आणि अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी भरती मेळावा ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. …

Read More »

बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे संगणक कक्षाचे उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून …

Read More »

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; तीन दिवसांच्या अथक शोधानंतर २५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला

  बेळगाव/चिक्कोडी : सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून खोल पाण्यात पडलेल्या २५ वर्षीय युवकाचा तीन दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी युवक पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच …

Read More »