Monday , September 21 2026
Breaking News

हिरेबागेवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांना अटक, १ लाख २२ हजारांची रोकड जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील शगणमट्टी लीफ फार्मजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून १० जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २२ हजार १६ रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.

सार्वजनिक ठिकाणी काही जण पैशांची पैज लावून ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती हिरेबागेवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून चेतन चंदगडकर, संतोष कोलकार, रमजान मुल्ला, खतलहृद बक्षी, मुदस्सर मुजावर, बालकृष्ण नाईक, आसिफ भगवान, रिझवान भगवान, सरफराज किल्लेदार आणि सय्यद युसूफ इनामदार यांना अटक केली.

दरम्यान, कारवाईदरम्यान आरोपी सचिन शिंदे हा घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांच्या कारवाईचे शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *