Monday , September 21 2026
Breaking News

बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व महाविद्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे संगणक कक्षाचे उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सहसचिव श्री. पी. पी. बेळगावकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविद्यालय सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील व श्री. हिरोजी पाटील, तसेच कमिटीचे सदस्य श्री. गंगाधर पाटील, श्री एम. एन. पाटील, श्री. पुंडलिक बेळगावकर, श्री. शिवराज हुद्दार तसेच सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जी. एस. पाटील व प्राचार्य श्री. एस. एस. मोहिते हे व्यासपीठावर उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुराडे व संस्थेचे सचिव श्री विक्रम पाटील तसेच उपस्थितांच्या हस्ते नूतन संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. उद़्घाटन प्रसंगी महाविद्यालय कमिटीचे उपाध्यक्ष, सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे सदस्य श्री पुंडलिक बेळगावकर यांनी इन्फ्रोट्रेन्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपनीकडून महाविद्यालयाच्या संगणक कक्षासाठी सात संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वरील संगणक उपलब्ध करुन देण्यासाठी श्री. मल्लाप्पा कांबळे, श्री. मल्लाप्पा मन्नुरकर, श्री. नारायण क. पाटील तसेच शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. मल्लाप्पा एन. पाटील यांनी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल त्यांचा कार्यक्रमाप्रसंगी सत्कार करण्यात आला.
डोंबिवली महानगरपालिका मुंबई, महाराष्ट्रचे माननीय नगरसेवक श्री. महेश गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी 100 वह्या देणगी स्वरूपात दिल्या. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे सदस्य श्री पुंडलिक बेळगावकर यांनी विद्यार्थ्यांना संगणक कक्षाचा उपयोग करुन घेण्याचे आवाहान केले.
संस्थेचे सचिव श्री. विक्रम पाटील यांनी विचार मांडताना, आजच्या तांत्रिक व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सामाजिक कौशल्य यांच्या विकासावर भर देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान मिळविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
संस्थेचे सहसचिव श्री. पी. पी. बेळगावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. शाळा व महाविद्यालय सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. मोहिते यांनी देणगीदारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस व्ही कांबळे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *