Monday , September 21 2026
Breaking News

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे अग्निवीर भरती मेळावा

Spread the love

 

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे युनिट मुख्यालय कोटा (UHQ) अंतर्गत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर लिपिक (क्लर्क) आणि अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी भरती मेळावा ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.

हा भरती मेळावा पुढील प्रवर्गांतील उमेदवारांसाठीच आयोजित करण्यात आला आहे:

युद्धातील वीरमृत्यू पावलेल्या सैनिकांच्या विधवा व पाल्य.

सेवेत असलेल्या सैनिक तसेच माजी सैनिक (लष्कर) यांच्या विधवा, पुत्र व बंधू.

उत्कृष्ट क्रीडापटू (मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन्स).

संगीतकार (म्युझिशियन) ट्रेडसाठी सर्व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

१ ऑक्टोबर २०२५ रोजी उमेदवारांचे वय १७ वर्षे ६ महिने ते २२ वर्षे असावे. शारीरिक पात्रता चाचणी (Physical Fitness Test) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स परीक्षा (CEE) मध्ये सहभागी व्हावे लागेल.

पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सविस्तर माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *