Sunday , July 26 2026
Breaking News

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; तीन दिवसांच्या अथक शोधानंतर २५ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला

Spread the love

 

बेळगाव/चिक्कोडी : सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून खोल पाण्यात पडलेल्या २५ वर्षीय युवकाचा तीन दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी युवक पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली.

या मोहिमेत बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, मायकेल पिंटो आणि शुभम हूळी यांनीही सक्रिय सहभाग घेत बचाव पथकाला सहकार्य केले.

सलग तीन दिवस सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाला युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर बचाव पथक आणि प्रशासनाने नागरिकांना, विशेषतः युवकांना, पाण्याच्या ठिकाणी सेल्फी किंवा धोकादायक छायाचित्रे काढण्याचा मोह टाळण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा स्वतःचा जीव अधिक महत्त्वाचा असल्याचे सांगत अशा ठिकाणी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे मृत युवकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

माळमारुती पोलिसांकडून ४६ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत; CEIR पोर्टलचा प्रभावी वापर

Spread the love  बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तब्बल ४६ मोबाईल फोन शोधून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *