Sunday , July 26 2026
Breaking News

अलतगा सरकारी मराठी शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी उत्साहात

Spread the love

 

अलतगा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अलतगा येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची पालखी-दिंडी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. बालवारकऱ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून हरिनामाच्या गजरात गावातून भक्तिमय दिंडी काढली.

दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची आकर्षक पालखी सजविण्यात आली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात शिवाजी चौक व मंदिर परिसरातून दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी भजने, अभंग आणि फुगड्यांच्या माध्यमातून आषाढी एकादशीचा उत्साह अनुभवला.

या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनीही मनापासून स्वागत करत शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षकांचा नेता म्हणून दत्तात्रय सावंत यांची लोकप्रियता : सीमाकवी रवींद्र पाटील

Spread the love  आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात सदिच्छा भेट; कुद्रेमानी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *