Sunday , March 8 2026
Breaking News

बेळगाव

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या ५ आरोपींना अटक

  बेळगाव : मोटारसायकलवरून येऊन नागरिकांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला बेळगाव जिल्ह्यातील नेसरगी पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी लोकांचे पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून पळून जात असत. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी त्यांचे कौतुक केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील …

Read More »

विविध शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते त्यानुसार तुरमुरी, कल्लेहोळ, कोणेवाडी, बाची, बसरीकट्टी, अष्टे, चंदगड, खणगांव आणि मुचंडी मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून यावर्षी बेळगाव, खानापूर, निपाणी भागातील जवळपास …

Read More »

श्री जोतिबा मंदिर येथे उद्या विविध कार्यक्रम….

  बेळगाव : श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर बेळगांव येथे श्रावण मासानिमित्त जोतिबा मंदिराच्या वतीने रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी श्री केदार विश्वशांती यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. सदर यज्ञा निमित्त सकाळी ७ वाजता श्री नाथांस रुद्र अभिषेक पुण्यवचन, गणपती पूजन, शक्ती पीठ पूजन, नवग्रह पूजन, रुद्र पीठ पूजन, …

Read More »

१० दिवसांत पीक कर्ज वाटप न केल्यास आंदोलन!

  मुतगा पीकेपीएस विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून मुथागा पीकेपीएसकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आलेले नाही. १० दिवसांत कर्ज वाटप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुतगा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. आज श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली मुतगा येथील शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना …

Read More »

पत्रकारिता सोपी झाली मात्र, पत्रकारांवरील जबाबदारी वाढली : प्रवीण टाके

  बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा बेळगाव : बदलत्या युगात पत्रकारितेत बरेच बदल घडत आहेत. आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता सहज सोपी झाली असली तरी पत्रकारांवरील जबाबदारी वाढली असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा माहिती विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात …

Read More »

कन्नडसक्ती तात्काळ थांबवा; मराठी भाषिक माजी नगरसेवकांची पालिका आयुक्तांकडे मागणी

  बेळगाव : सध्या बेळगाव महानगरपालिकेत चालू असलेली कन्नडसक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना ऍड. अमर …

Read More »

कन्नडसक्ती दूर करा, मराठीला स्थान द्या : युवा समिती सीमाभागची शेट्टर यांच्याकडे मागणी

  बेळगाव : मराठी भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या मातृभाषेत शासकीय सेवा मिळाव्यात व कन्नडसक्ती याबाबत बेळगावचे खासदार श्री. जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली. अलीकडेच पार पडलेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यात सर्वत्र फक्त कन्नड भाषेचा वापर सक्तीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय विशेषतः सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांवर अन्यायकारक …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक ३ रोजी

  बेळगाव : येत्या ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नडसक्तीबद्दल होणाऱ्या मोर्चाबाबत विचार विनिमय करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक ३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हरब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण …

Read More »

महिलेवर बलात्कार प्रकरण : खासदार प्रज्ज्वल रेवण्णा दोषी

  नवी दिल्ली : माजी पंतप्रधानांचे नातू आणि माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा ४७ वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. निकाल जाहीर होताच प्रज्वल रेवण्णा न्यायालयात भावनिक झाले आणि रडू लागले. न्यायालयातून बाहेर पडतानाही ते सतत रडत होते. एफआयआर दाखल झाल्यानंतर अवघ्या १४ महिन्यांत या प्रकरणाचा निर्णय …

Read More »

खासदार निलेश लंके यांचे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा; लोकसभेत आवाज उठविण्याचे आश्वासन..

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खासदार निलेश लंके यांना सीमाप्रश्नी लोकसभेत आवाज उठवण्यात यावा, या संदर्भात निवेदन देण्यात आले. निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी सदर निवेदन दिले. यावेळी निलेश लंके यांनी मराठी भाषिकांच्या व्यथा लोकसभेत मांडणार …

Read More »