बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार आणि अभ्यासक डॉ. संजय कळमकर यांचे दुसऱ्या सत्रात “साहित्यानंद…!” या विषयावर …
Read More »कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
कावळेवाडी… दरवर्षी प्रमाणे यंदाही तुकाराम बीजचे औचित्य साधून सलगपणे २६ वर्षे कावळेवाडी गावात उद्या रविवारी पासून पहाटे पासून सुरू होत आहे. अधिष्ठान हभप मारुती म.पाटील, उप अधिष्ठान हभप शिवाजी जाधव. १५ मार्चला गावातून संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिनांक ९ मार्चला वाचनालयाचे …
Read More »बिजगर्णीत उद्या म्हैस पळवण्याची जंगी शर्यतीचे आयोजन
बेळगाव : शेतकऱ्यांच्या जीवनातील एक घटक व जीवापाड प्रेम करतो ती त्यांची जीवनदाहिनी म्हणजे “म्हैस” पळवण्याच्या शर्यतीचे आयोजन करत असतो. यावर्षी देखील श्री शिव शक्ती युवा संघटना यांच्या वतीने होळी निमित्य भव्य म्हैस पळविण्याची स्पर्धा अयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उद्या रविवारी 16 मार्च रोजी …
Read More »कंग्राळी खुर्द शाळेत आर्थिक गैरव्यवहार!
एसडीएमसीची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा बेळगाव : कंग्राळी खुर्द प्राथमिक मराठी शाळेतील गत दोन मुख्याध्यापकांनी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याबाबत त्यांनी कबुली देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच गैरव्यवहार केलेली रक्कमही अद्याप जमा केलेली नाही. आठ दिवसांत रक्कम जमा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा एसडीएमसी, ग्रा. पं. सदस्य …
Read More »मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रंगले बाग साहित्य परिवार समुहाचे वर्धापन दिन व कवी संमेलन
बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाग साहित्य परिवाराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जायंट्स मेन ग्रूप येथे बाग परिवार कवींचे कविसंमेलन नुकतेच पार पडले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांना निमंत्रित करण्यात आले होते. कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी मा.बसवंत शहापूरकर व मार्गदर्शक म्हणून पुढारीचे पत्रकार मा. …
Read More »महापौरपदी मंगेश पवार तर उपमहापौरपदी वाणी जोशी यांची बिनविरोध निवड
बेळगाव : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज शनिवारी पार पडली. महापौरपदी प्रभाग क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार तर प्रभाग क्रमांक 44 च्या नगरसेविका वाणी जोशी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाचे म्हणजे महापौर आणि उपमहापौर दोन्हीही पदे शहराच्या दक्षिण मतदारसंघाला प्राप्त …
Read More »काँक्रीट मिक्सर लॉरी धावत्या कारवर उलटली: दोन जण गंभीर जखमी
बेळगाव : केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर काँक्रीट मिक्सर लॉरी धावत्या कारवर उलटल्याने कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर काँक्रीट मिक्सर लॉरी केए-25 एमडी 6506 क्रमांकाच्या कारवर उलटली. या अपघातात बागलकोट …
Read More »हुलबत्ते कॉलनीत जल्लोषात रंगोत्सव…
बेळगाव : रंगांची बेभान उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली चिमुकली मुले, महिला वर्ग, आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, डीजेवरील ठेक्यावर मनमुरादपणे चिंब झालेल्या मैत्रिणी तसेच युवतींचा उत्साह आणि सप्तरंगाची उधळण करत शुक्रवारी (दि. १४) शहरातील हुलबत्ते कॉलनीत रंगोत्सव …
Read More »स्वप्न मोठी ठेवा आणि त्यासाठी मेहनत करा : रणजीत चौगुले
मार्कंडेय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ बेळगाव : स्वप्न नेहमी मोठी पाहा, पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा. प्रत्येक अडचण ही नव्या संधीची सुरुवात असते. मेहनत, सातत्य आणि सकारात्मक विचारसरणी या त्रिसूत्रीने तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल असे उदगार सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी काढले. मार्कंडेय हायस्कूल, मार्केट यार्ड …
Read More »जायंट्स मेनची रंगपंचमी यावर्षीही माहेश्वरी अंध शाळेतच; अंध विद्यार्थ्यासमवेत साजरा केला होळी सण
बेळगाव : अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर सर्कल येथील माहेश्वरी अंध शाळेत रंगपंचमी साजरी करण्यात आली. संपुर्ण बेळगावात सर्वच जण या उत्सवाचा आनंद घेतात, पण ज्यांनी हे जगच पहिले नाही, अशा विद्यार्थ्यासमवेत दरवर्षी प्रमाणे या वर्षीची माहेश्वरी अंधशाळेत रंगपंचमी साजरी करीत आहोत, असे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta