Sunday , July 26 2026
Breaking News

20 जूनपासून चौथे रेल्वे गेट अंडर पास कामाला सुरुवात; वाहतूक मार्गात बदल

Spread the love

 

बेळगाव : चौथे रेल्वे गेट अंडरपासचे काम सुरू होणार असून वाहतूक व्यवस्थेसाठी जनतेने पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन बेळगाव रहदारी पोलिसांनी केले आहे. बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात याची माहिती दिली आहे.

बेळगाव शहरातील अनगोळ येथील 4थ्या रेल्वे अंडर ब्रिजच्या बांधकामाला येणाऱ्या 20.06.2025 पासून 19.06.2026 पर्यंत सुरूवात होणार आहे. हे बांधकाम सुमारे एक वर्ष चालेल. या कामाच्या पूर्णत्वापर्यंत जनतेच्या सुगम वाहतूक व्यवस्थेसाठी खालीलप्रमाणे सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून जनतेने खालील पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा.

1) अनगोळहून बेम्कोकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी अनगोळहून डी.व्ही.एस. चौक, हरिमंदिर रोड, अनगोळ नाका, 3रा रेल्वे गेट ओव्हर ब्रिज मार्गे खानापूर रस्त्याला जोडून पुढे जावे.

2) खानापूरकडून बेम्को सर्कल मार्गे 4थ्या रेल्वे गेटद्वारे अनगोळकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बेम्को सर्कलपासून 3रा रेल्वे गेट ओव्हर ब्रिज, अनगोळ नाका, हरिमंदिर रोड मार्गे पुढे प्रवास करावा.

वरील वाहतूक बदलांना जनतेने बेळगाव शहर पोलिसांशी सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस आयुक्तांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *