Friday , November 6 2026
Breaking News

बसमधील खिडकीकडे बसण्यावरून विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार; विद्यार्थी गंभीर जखमी

Spread the love

 

बेळगाव : बसच्या खिडकीकडे बसण्यावरून विद्यार्थ्यावर अज्ञात तरुणांच्या एका गटाने धारदार शस्त्राने वार केल्याची घटना आज बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर घडली.

बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर, बसच्या खिडकीच्या सीटसाठी अज्ञात तरुणांचे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी भांडण झाले, भांडण वाढले आणि विद्यार्थ्याच्या छातीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि तो पळून गेला. जखमी विद्यार्थी हा बेळगाव तालुक्यातील पंतबाळेकुंद्री गावातील असून माज सनदी (१९) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डीसीपी रोहन जगदीश यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. पंत बाळेकुंद्री ते बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत हाणामारी सुरू होती, जिथे अज्ञात तरुणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. बसमधील अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ३ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी।मिळाली आहे.

इम्रान पीरजादे म्हणाले की, हाणामारीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना बेळगाव मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *